

EV Charging Rules
दिल्ली : जर तुम्ही इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर वापरत असाल आणि रात्री चार्जिंग करणे सोयीचे वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रात्रीच्या वेळी चार्जिंग केल्यास ३० टक्के अधिक पैसे भरावे लागणार आहेत.
नवीन नियमानुसार चार्जिंग वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तुमची ईव्ही चार्ज केली तर तुम्हाला ३० टक्के कमी दर भरावा लागेल. म्हणजे जर पूर्वी चार्जिंगसाठी १०० रुपये लागत होते, तर आता फक्त ७० रुपये लागतील. जर दुपारी ४ ते सकाळी ९ या वेळेत चार्जिंग केल्यास ३० टक्के जास्त दर आकारले जातील. म्हणजेच १०० रू च्या चार्जिंगसाठी आता तेच शुल्क १३० रुपये असेल.
फक्त सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसाठीच हे नवीन दर लागू होतील.
घरच्या चार्जिंगवर याचा परिणाम होणार नाही.
सध्या केरळमध्ये हे दर लागू झाले आहेत.
केरळ राज्य विद्युत नियामक आयोगाने EV चार्जिंगसाठी नवीन दर लागू केले आहेत.
EV चालकांना आता केवळ वाहन चालवण्याचा प्लॅन नव्हे, तर चार्जिंगची वेळ देखील नीट ठरवावी लागणार आहे. दिवसा चार्जिंग केल्यास बचत होईल. मात्र, रात्री चार्जिंग करणाऱ्यांसाठी ही नवी व्यवस्था डोकेदुखी ठरू शकते. स्मार्ट प्लॅनिंग केल्यास चार्जिंगवरील खर्च नियंत्रित करता येईल.
सरकारचा उद्देश ग्रीन एनर्जीला चालना देणे आणि ग्रीडवरील लोड कमी करणे हा आहे. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारचे वेळ आधारित चार्जिंग दर देशभर लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.