जनता सेवा पक्षाचा प्रमुख आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काकीनाडा जिल्ह्यातील पिथापुरम मतदारसंघातून 1,34,394 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी व्हीएसआरसीपीचे उमेदवार वंगा गीता विश्वनाथ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. पिठापुरम हा कापू समाजाचे वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जाताे. पवन कल्याण आणि वंगा गीता हे दोघेही त्याच समुदायाचे आहेत. पवन कल्याण यांच्या जनता सेवा पक्षाने सर्व २१ जागा जिंकल्या आहेत. Election Result 2024