राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा धुळ्यात जल्लोष

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा धुळ्यात जल्लोष
Published on
Updated on

धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मार्फत नेत्या सुप्रिया सुळे व पक्षाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या जनतेने एकदा परत शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास दाखवला. एकजुटीने सर्व महाराष्ट्राची जनता शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. बारामतीच्या चुरशीच्या लढतीमध्ये नेत्या सुप्रियाताई सुळे यांचा मोठा मताधिकाने विजयी झाला. महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस पेक्षा जास्त जागा शरद पवार यांनी आज निवडून आणल्या. फोडाफोडीचे राजकारण करून महाराष्ट्रातून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या लालशी महत्त्वकांक्षी पोटी काहींनी फोडला. पक्षाचे नाव व चिन्ह देखील चोरले.त्यावेळी अनेक गद्दारांनी, संधीसाधूने पक्ष सोडला. शरद पवारांची साथ सोडली. शरद पवार यांना या वयात दुःख देण्याचे काम केले. तरी सुद्धा महाराष्ट्राची जनता ही शरद पवारांच्या पाठीमागे उभी राहिली. शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की महाराष्ट्रात फक्त शरद पवार हाच एक ब्रँड चालतो.

या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष मार्फत रणजीत भोसले शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. नवीन धुळे महानगरपालिकेच्या समोर ढोल ताशांच्या गजरांमध्ये एकमेकांना पेढे भरून जल्लोष सादर करण्यात आला. यावेळेस कार्यकर्त्यांनी झेंडे फडकवून व टोपी घालून शरद पवार , सुप्रियाताई सुळे , जयंत पाटील, रोहित पाटील यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

यावेळेस रणजीत भोसले,जोसेफ मलबारी, अण्णा सूर्यवंशी डी. टी. पाटील,यशवंत पाटील, नेरकर, दिलीप पाटील, दीपक देवरे, दीपक देसले, कुणाल वाघ, डॉमिनिक मरबारी, वाल्मीक मराठे, निखिल वाघ, किरण बागुल, अशोक धुळकर, राजू डोमाळे, गोरख शर्मा, जितू पाटील, राजेंद्र चौधरी, दत्तू पाटील, नुरुद्दीन शाह, रामेश्वर साबळे, भाग्येश मोरे, स्वामिनी पारखे, चेतना मोरे, जयश्री घेटे युनूस शेख, राजू मशाल, आकाश बैसाणे, समद शेख, प्रणव भोसले,सलमान खान, सोनू गुजर,कल्पेश मगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news