Election Commission Voter List: वादग्रस्त EC ने नागरिकांनाच लावलं कामाला... डुप्लिकेट नाव शोधून देणाऱ्याला मिळणार 'इनाम'

Election Commission Voter List
Election Commission Voter List
Election Commission Voter Listpudhari
Published on: 
Updated on: 

Election Commission Voter List: उत्तर प्रदेश मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक आयोग सर्व दिशांनी अडचणीत आलेला असताना आता निवडणूक आयोगाने नवीन शक्कल लढवली आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांनाच कामा लावत जर तुम्ही डुप्लिकेट नाव शोधून दिलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार अशी नवीन स्कीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे जोडण्याबरोबरच मतदार यादी जास्तीजास्त शुद्ध बनवण्यावर देखील जोर दिला जात आहे. अशात ज्या मतदारांचे यादीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा नाव आले आहे. त्यांना शोधून मतदार यादीतील गोंधळ कमी केला जात आहे.

Election Commission Voter List
Election Commission: निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष द्या... निवडणूक प्रचारापासून रहावं लागणार दूर, आयोगाचं आलं फरमान

राजकीय पक्ष अन् जनतेलाही टार्गेट

बीएलओ सोबतच राजकीय पक्ष आणि सामान्य जनता यांना देखील डुप्लिकेट मतदार शोधण्यासाठी टार्गेट दिलं गेलं आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्या देखरेखी खाली ही मोहीम राबवली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील मतदार यादीवर समाजवादी पक्ष, काँग्रेससह भाजपने देखील आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकराची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १.२७ कोटी हिंदू मतदारांचे नाव यादीतून वगळ्याचा आरोप केला आहे.

Election Commission Voter List
Election Commission Of India: निवडणूक आयोगात जबाबदाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल, वादग्रस्त सीमा खन्नांच्या कामकाजावर असणार 'देखरेख'

अखिलेश यादव यांचे देखील आरोप

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील मतदार यादीत अनेक लोकांची नावे दोन किंवा त्यापेक्षा जास्तवेळा आली आहे असं निदर्शनास आणून दिलं आहे. लखनौमध्ये माध्यमांसमोर अखिलेश यादवने अशा लोकांना सर्वांसोमर आणत त्यांचे नाव दोन नाही तर अनेक ठिकाणी असल्याचा दावा केला. त्यांनी भाजपवर आरोप देखील केला. भाजपने बोगस मतदान करण्यासाठी बोगस मतदार अनेक ठिकाणी जोडले आहेत. मतदानावेळी खोटे आधार कार्ड बनवून डबल नाव असलेल्या मतदारांकडून मत टाकून घेतलं जाईल असा आरोप देखील त्यांनी केला.

Election Commission Voter List
Election Commission Affidavit: ज्ञानेश कुमारांनी सहकाऱ्यांना का सांगितलं नाही... SC मध्ये दाखल प्रतिज्ञापत्रात उत्तरेच नाहीत?

एसआयआरमध्ये २६.२१ लाख डुप्लिकेट मतदार

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसात एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात २.०४ कोटी लोकांची नावे वगळण्यात आली. त्यातील २६.२१ लाख डुप्लिकेट मतदार असल्याचं समोर आलं होतं. आता एसआयआर प्रक्रियेअंतर्गत १७ नोव्हेंबर रोजी डुप्लिकेट मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.