Rajya Sabha Elections | राज्यसभेच्या १२ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर, 'या' तारखेला मतदान

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील २ जागांसाठी होणार निवडणूक
Rajya Sabha Elections
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १२ रिक्त जागांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. (file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या (Rajya Sabha Elections) १२ रिक्त जागांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ आणि २७ ऑगस्ट आहे. राज्यसभेच्या १२ रिक्त जागांमध्ये आसाम २, बिहार २, महाराष्ट्र २ तसेच हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा, ओडिशा येथील प्रत्येकी १ जागेचा समावेश आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Union Ministers Piyush Goyal) लोकसभेवर निवडून गेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), के. सी. वेणूगोपाल, सर्बानंद सोनोवाल यांच्यासह एकूण १० विद्यमान सदस्य लोकसभेवर निवडून गेल्याने दहा जागा रिक्त झाल्या आहेत. दोन सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.

Rajya Sabha Elections
राज्यसभा निवडणूक निकाल : आज ते जिंकले असतील, पण आम्ही उद्या पाहू…- संजय राऊत 

लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या १० जागा रिक्त

मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि सातारा येथून उदयनराजे भोसले भाजपच्या तिकीटावर निवडून आल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय मध्य प्रदेशातील गुणा लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव, आसाममधील खासदार कामाख्या प्रसाद तासा, सर्वानंद सोनोवाल हे सुद्धा लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. सर्बानंद सोनोवाल यांची नव्या सरकारमध्ये बंदरे व जलवाहतूक मंत्रीपदी वर्णी लागली आहे. 

राजस्थानमधील काॅंग्रेसचे राज्यसभा सदस्य के. सी. वेणूगोपाल केरळच्या आलप्पुुझा मतदारसंघात विजयी झाले आहेत. बिहारच्या पाटलीपूत्र मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर निवडून आलेल्या मीसा भारती राज्यसभा सदस्य आहेत. भाजपचे राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर यांनी  बिहारच्या बांकीपूरमधून विजयी झाले आहेत. हरियाणाचे काॅंग्रेस नेते दीपेंद्रसिंह हुडा रोहतकमधून निवडून आले आहेत. त्यांचीही जागा रिक्त झाली आहे.

Rajya Sabha Elections
सोशल इंजिनिअरिंग ते राजकीय पुनर्वसन; राज्यसभा उमेदवारीतून भाजपची खेळी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news