पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आज ते जिंकले असतील… पण आम्ही उद्या पाहू… निवडणुकीत असं होत असतं. दबावानं विजय हा मिळालेला विजय नव्हे.
काल १० जूलै रोजी राज्यसभा निवडणूक मतदानाला सकाळी ९ ला सुरुवात झाली सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मतदानानंतर ८ ते ९ तासांच्या प्रतीक्षेनंतर राज्यसभेच्या ६ जागांचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आज ते जिंकले असतील, पण आम्ही उद्या पाहू. निवडणुकीत असं होत असतं. दबावानं विजय मिळालेला विजय नव्हे.
ते पुढेही असेही म्हणाले, पक्षाचे आमदार फुटले नाहीत तर काही अपक्ष आमदार, तर काही छोट्या पक्षाचे आमदार फुटले आहेत. त्यांना काही आमिषे दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे.
एक मत बाद केलं, काही बाहेरची अपेक्षित मत आम्हाला पडली नाहीत. भाजपनं जागा नक्कीच जिंकली पण विजय झाला असं मी म्हणत नाही. भाजपचे हे घाणेरडे राजकारण आहे. ईडीचा डाव फसल्यानंतर त्यांनी रडीचा डाव टाकला आहे. पराभव समोर दिसू लागल्याने व डाव फसल्याने भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाचा आश्रय घेतला; असेही ते म्हणाले.