Abhijeet Dipke: ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’; अभिजित दीपकेची पहिली प्रतिक्रिया, पण आंदोलन सुरुच राहणार, कारण काय?

CJP Founder Abhijeet Dipke Reacts: परीक्षांमधील अनियमितता आणि NEET पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
CJP Founder Abhijeet Dipke Reacts
CJP Founder Abhijeet Dipke ReactsPudhari
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Resigns CJP Founder Abhijeet Dipke Reacts: परीक्षांमधील अनियमितता आणि NEET पेपर लीक प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. सोशल मीडियावर हे पत्र शेअर करत त्यांनी देशहितासाठी आणि राष्ट्रीय एकतेसाठी हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच, जंतर-मंतरवर आणि देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया देताना 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले, "आपण हे करून दाखवले! धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे."

CJP च्या अधिकृत वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, "हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा मोठा विजय आहे. आज कॉकरोचेस जिंकले.. लोकशाही जिंकली! जय हिंद!"

गेल्या काही महिन्यांपासून CJP आणि इतर विद्यार्थी संघटना शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकतेची मागणी करत जंतर-मंतरवर ठाण मांडून होत्या. अखेर सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलनकर्त्या तरुणांच्या संघर्षाला यश आले असून, देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news