Kolkata Earthquake: बांगलादेशात जमीन थरथरली अन् कोलकात्यातील लोकं घर, ऑफिसमधून थेट रस्त्यावर

Earthquake
Earthquake pudhari photo
Published on
Updated on

Kolkata Earthquake: कोलकात्यात आज दुपारी भूकंपाचे तीव्र झटके बसले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.५ इतकी होती. या भूकंपामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. लोकं सगळीकडे सैरभैर होऊन धावत होते. घरातून आणि ऑफिसमधून लोकांचे झुंड रस्त्यावर येत होते. सध्या तरी कोणत्याही जीवित किंवा वित्त हानीची बातमी मिळालेली नाही.

Earthquake
Afghanistan Pakistan Conflict: अफगाणिस्तान युद्धामुळं पाकिस्तानचे तुकडे होणार? BLA च्या हल्ल्यांनीही पाक लष्कर हैराण

१०० किलोमीटरवर केंद्रबिंदू

सुरूवातीच्या काही रिपोर्ट्सनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हा शेजारी देश बांगलादेशमध्ये होता. या भूकंपाचे झटके काही सेंकदच जाणवले. मात्र उंच इमारतींमध्ये याची तीव्रता जास्त जाणवत होती.

मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून १० किलोमीटर आत होता. कोलकात्यापासून १०० किलोमीटर दूर हा केंद्रबिंदू होता.

Earthquake
Pakistan Afghanistan Conflict: अफगाणिस्ताननं पाकिस्तानचं F-16 पाडलं...? मुनीर तोंडावर आपटले, ४० पाकिस्तानी ठार

लोकांनी मोकळ्या जागी जाणं केलं पसंत

शहरातील अनेक भागातील लोकांनी घरातील ऑफिसमधील फर्निचर हलत असल्याचं आणि छतावरील पंखे देखील हलत असल्याची माहिती दिली. अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भूकंपाची जाणीव होताच मोकळ्या जागी जाणे पसंत केले. याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

Earthquake
Crime News: पोटच्या दोन लेकींनीच केला बापाचा खून; एकीने पाय धरले, दुसरीने गळा चिरला; कारण ऐकून हादराल!

भूकंप कसा होतो?

टेक्टॉनिकल प्लेट्स जमिनीच्या आत असलेल्या लाव्हारसामुळं अत्यंत संथ गतीनं तरंगत किंवा सरकत असतात. ज्यावेळी या टेक्टॉनिकल प्लेट्स एकमेकांवर आदळतात त्यावेळी त्या एकमेकांपासून दूर जातात. तर काही वर खाली होत राहतात. त्यामुळं त्यांच्या कडांवर मोठा दबाव निर्माण होतो. या दबावामुळं डोंगर अचानक तुटू लागतात. ते वेगाने खचत असतात. यामुळं मोठी उर्जा निर्माण होते. ज्यावेळी ही लाट जमिनीवर पोहचते त्यावेळी जमीन हादरते आणि भूकंप जाणवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news