

Rahul Gandhi press conference presentation on how election rigged
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगावर टीका करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याची टीका केली होती. तसेच आमच्याकडे पुरावे असून ते पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडू असेही सांगितले होते. तेच प्रेंझेंटेशन राहुल गांधींनी आज, गुरुवारी केले. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेनशन देत मत चोरी कशी झाली, हे दाखवून दिले.
दरम्यान, या वेळी निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत झाली होती का असा सवाल उपस्थित करत राहुल यांनी आयोग सीसीटीव्ही फुटेज, मतदार यादी नष्ट का करू इच्छितो, असाही सवाल केला. तसेच निवडणूक आयोग भारतीय लोकशाही नष्ट करत चालला आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत खूप संशय होता. पण लॉजिकल कारण कुणालाच सांगता येऊ शकत नव्हते. महाराष्ट्रात 5 महिन्यात खूप मतदार वाढले. ते इतके वाढले की एकूण 5 वर्षात तेवढे वाढले नव्हते. एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त मतदार दाखवले गेले. हे खूप संशयास्पद होते. लोकसभेत इंडिया आघाडीला खूप चांगले यश मिळाले. आणि त्यानंतर पाचच महिन्यात इंडिया आघाडीला खूप कमी यश मिळाले. भाजप सत्तेत आली.
त्यानंतर मी विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिला. त्यात मी म्हटले होते की, महाराष्ट्रातील निवडणूक ही चोरली गेली होती. याचा सारांश काय होता. तर मतदार यादी ही मुख्य गोष्ट आहे. पण निवडणूक आयोगाने ती मतदार यादीच आम्हाला देण्यास नकार दिला. हे खूप संशयास्पद होते. आम्हाला मतदार यादीतील नावे अशी दिली गेली की त्याचे विश्लेषणच करता येऊ नये.
राहुल म्हणाले, एक इंटरेस्टिग गोष्ट निवडणूक आयोगाने जाहीर केली ती म्हणजे ते आता सीसीटीव्ही फुटेजही डिलीट करणार. म्हणजे याची काहीही गरज नसताना असा निर्णय कशासाठी. त्यामुळे संशय अधिक बळावतो. निवडणूक आयोग भाजपसोबत मिळून काम करतोय आणि त्यांनी मिळून ही निवडणूक चोरली. आमच्याकडे पुरावा आहे. आमच्याकडील पुरावा व्यापक आहे.
जर एखाद्याने दोनवेळा मतदान केले असेल आणि ते शोधून काढायचे असेल तर... आम्ही त्यासाठी प्रत्येक फोटोची पडताळणी केली. दुबार मतदान घडले आहे की नाही हे आम्ही तपासले.
इलेक्ट्रॉनिक डेटा देण्यास आयोगाने का नकार दिला ते आम्हाला कळले. कारण आम्हाला कारण कळू नये, असे त्यांना वाटत होते. गेल्या सहा महिन्यात आम्ही याचा अभ्यास केला. मतदार याद्यांमध्ये घोळ केला गेला होता. त्यामुळेच आम्हाला डेटा देण्यास नकार देण्यात आला. निवडणूक आयोग नेमके कशाचे संरक्षण करत होता.
त्यानंतर आम्ही अभ्यास केला. आम्ही 16 जागा जिंकू शकत होतो, असा आमचा अंदाज होता पण आम्ही कर्नाटकात 9 जागा जिंकल्या. आम्ही एक विधानसभा मतदारसंघ निवडला. महादेवपूर. 2024 चा डेटा आमच्याकडे आहे. लोकसभेतील एकूण मतदान जेवढे झाले.
महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 100250 मतदानाची चोरी झाली. डुप्लीकेट मतदार, दुबार मतदान, पत्ता नसलेले मतदार, एकाच ठिकाणचे बल्क मतदार ज्यात एकाच ठिकाणी अनेक मतदार राहत असलेले दाखवले गेले, इनव्हॅलिड फोटोज असलेले मतदार, फॉर्म 6 चा गैरवापर (हा फॉर्म नवमतदारांसाठी होतो) गुरकिरतसिंह नावाच्या मतदाराने चार वेगवेगळ्या पोलिंग बूथवर चार वेळा मतदान केले.
असे मतदान हजारो नागरिकांनी केले. असेच प्रकार वाराणसीमध्येही झाले. आदित्य श्रीवास्तव याने दोनवेळा मतदान केल्याचे दिसून येते. कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यात या मतदाराचे नाव आहे. अशी हजारो नावे सापडली. डुप्लिकेट मतदार सुमारे 11000 आहेत.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत डुप्लिकेट मतदारांची यादीच दिली. फेक पत्ते असलेल्या मतदारांचीही माहिती राहुल यांनी दिली. अनेक मतदारांच्या पत्त्यामध्ये हाऊस नंबर. 0, स्ट्रीट नंबर 0 असा पत्ता आहे. वडिलांचे नावही अनेकांचे सेमच दिसून आले. मूळात ते नावच अस्तित्वात नसलेले आहे. हसू नका, हीच मतचोरी आहे. असेही राहूल म्हणाले. फेक पत्ता असलेले 40 हजार मतदार आहेत.
हाऊस नंबर 35 मध्ये 80 मतदार राहत असल्याचे मतदार यादीत म्हटले आहे. आम्ही तपासले तेव्हा ते अर्थातच फेक असल्याचे दिसून आले. अनेक मतदार सिंगल बेडरूममध्ये राहत असल्याचे मतदार यादीत म्हटले होते. पण आम्ही चेक केल्यावर ते फेक असल्याचे दिसून आले.
मतदार कार्डवरील अनेक पत्ते अस्तित्वातच नव्हते. 4000 मतदारांचे फोटोच नव्हते. ओरिजिनल मतदार यादीच्या कॉपीतील हा डेटा आहे.
राहुल गांधी म्हणाले, नवमतदारांनी पंतप्रधानांना मतदान केले असे वारंवार सांगितले गेले. 33692 नवमतदार होते. बेंगळूरुमधील शकुन राणी या 17 वर्षीय मुलीने मतदान केले. 17 वर्षांची मुलगी मतदान कशी करू शकते. विशेष म्हणजे या मुलीचा फोटो पाहा. ही वृद्ध महिला आहे. वृद्ध महिला नवमतदार कशी असू शकते.
विशेष म्हणजे शकुन राणीने दोन वेगवेगळ्या पोलिंग बुथवर दोन वेळा मतदान केले. एकाच मतदारसंघात असे 33 हजारांवर मतदार आहेत. या नवमतदारांच्या वयावर लक्ष दिले तर अनेकांची वये 90 च्या पुढे दिसतात. 90 वयापुढील मतदार नवमतदार असतात का.
या कारणांमुळे निवडणूक आयोगाने डेटा देण्यास नकार दिला. हरयाणा निवडणुकीतील भाजप आणि काँग्रेसमधील जिंकण्याचे मार्जिन बघा. 650000 लाख मतदार होते. पण त्यातील 1 लाख मतदार अस्तित्वातच नव्हते. ते बनवले गेले. आम्ही आयोगाला काय म्हणतो. की निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही नष्ट करू नये. त्यानी लोकशाही वाचवली पाहिजे.
लोकसभेत पीएम मोदींना केवळ 25 जागांची गरज होती सत्तेत येण्यासाठी. ते त्यांनी केले. आम्ही हा पॅटर्न बघितला आहे. आता सीसीटीव्ही फुटेज आणि मतदार यादी हा मुख्य पुराव आहे. आणि निवडणूक आयोग ते नष्ट करण्याचे काम करत आहे. परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्यांनी सांगितले आहे की, ते सीसीटीव्ही फुटेज डीलीट करणार. हे भारतीय लोकशाहीचे वास्तव आहे.