Mumbai-born Biotech CEO | मुंबईची कन्या ते अमेरिकेतील बायोटेक क्षेत्रातील सीईओ; रेश्मा केवलरामाणी झळकल्या ‘Fortune’च्या यादीत...

Mumbai-born Biotech CEO | टॉप 100 बिझनेस लीडर्समध्ये प्रवेश; यादीत सत्या नाडेला, सुंदर पिचाई, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचाही समावेश
reshma kevalramani
reshma kevalramaniPudhari
Published on
Updated on

Mumbai-born Biotech CEO Reshma Kewalramani

पुढारी ऑनलाईन डेस्क : वैद्यकीय क्षेत्रातून बायोटेक उद्योगात प्रवेश करत, संशोधनात सातत्याने नवनवीन उंची गाठणाऱ्या आणि नेतृत्वाच्या जोरावर अमेरिकेतील दिग्गज कंपनीचे भविष्य घडवणाऱ्या एका भारतीय महिलेने आता जागतिक मान्यता मिळवली आहे.

मुंबईत लहानपणी वाढलेल्या आणि अमेरिकेत जाऊन मेहनतीच्या जोरावर यशाची नवी व्याख्या ठरवणाऱ्या रेश्मा केवलरामाणी यांनी जगप्रसिद्ध ‘Fortune’ मासिकाच्या ‘100 सर्वाधिक शक्तिशाली व्यवसायिक व्यक्ती’च्या 2025 च्या यादीत स्थान मिळवून एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

62व्या क्रमांकावर झळकणाऱ्या रेशमा या अमेरिकेतील मोठ्या बायोटेक कंपनीच्या पहिल्या महिला CEO ठरल्या असून, त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे – विशेषतः भारतीय महिलांसाठी, जे जागतिक व्यासपीठावर स्वतःचा ठसा उमटवू इच्छितात.

पहिल्या महिला CEO – बायोटेकमध्ये इतिहास घडवणारी भारतीय

रेश्मा केवलरामाणी या अमेरिकेतील आघाडीची बायोटेक कंपनी Vertex Pharmaceuticals च्या CEO पदाची धुरा सांभाळत आहेत. रेश्मा केवळरामाणी या अमेरिकेतील मोठ्या बायोटेक कंपनीच्या CEO होणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

2020 साली त्यांनी Vertex Pharmaceuticals या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आणि अल्पावधीतच कंपनीचा चेहरामोहरा बदलला. सध्या या कंपनीचे मूल्यांकन सुमारे $110 अब्ज (डॉलर) इतके आहे.

reshma kevalramani
PM Modi to visit China | पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO परिषदेसाठी चीनला जाणार; गलवान संघर्षानंतर प्रथमच चीनचा दौरा

मुंबईतून अमेरिकेपर्यंतचा प्रवास

रेश्मा यांचा जन्म मुंबई येथे झाला. 11 वर्षांची असताना त्या कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी Massachusetts General Hospital आणि Brigham and Women’s Hospital येथे डॉक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

नंतर त्यांनी बायोफार्मा क्षेत्रात प्रवेश केला. 2017 मध्ये Vertex मध्ये सामील झाल्यावर, 2018 मध्ये त्या कंपनीच्या Chief Medical Officer झाल्या. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत म्हणजे 2020 मध्ये त्या CEO बनल्या.

FDA मान्यता मिळवणाऱ्या 'Journavx' औषधामागील नेतृत्त्व

Fortune मासिकाने त्यांच्या यादीत रेश्मा यांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकत विशेषतः ‘Journavx’ या नवीन आणि opioid-मुक्त वेदनाशामक औषधाच्या FDA मान्यतेचा उल्लेख केला. त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचा प्रभाव कंपनीच्या संशोधन व नवोन्मेषावर स्पष्टपणे जाणवतो.

reshma kevalramani
Lula refuses Trump call | ट्रम्प यांच्यापेक्षा मी नरेंद्र मोदींना कॉल करेन! ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला आक्रमक; ट्रम्प यांच्यावर पलटवार

Fortune यादीत आणखी कोण?

या यादीत भारतीय आणि भारतीय वंशाच्या इतर बड्या व्यक्तींमध्ये Microsoft चे CEO सत्य नडेला (क्र. 2), Google चे CEO सुंदर पिचाई (क्र. 6), Reliance चे अध्यक्ष मुकेश अंबानी (क्र. 56), YouTube चे CEO नील मोहन (क्र. 83), आणि Adani Group चे अध्यक्ष गौतम अदानी (क्र. 96) यांचा समावेश आहे.

बायोटेक क्षेत्रातील भारतीय महिला नेतृत्वाचा गौरव

रेश्मा केवलरामाणी यांची ‘Fortune 100’ यादीतील ही पहिलीच एन्ट्री असली तरी त्यांचे जागतिक नेतृत्वामधील स्थान आता अधिक बळकट झाले आहे. एक भारतीय वंशाची महिला CEO म्हणून त्यांनी अमेरिकेतील आणि जागतिक बायोटेक उद्योगात महत्वपूर्ण ठसा उमटवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news