DRDO TARA Test: काय आहे DRDO ची 'TARA' शस्त्रप्रणाली? आज पार पडली पहिली यशस्वी चाचणी; शत्रूसाठी ठरणार 'काळ'!

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'टॅक्टिकल ॲडव्हांस्ड रेंज ऑगमेंटेशन' या स्वदेशी शस्त्रास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली.
DRDO TARA kit
DRDO TARA kitfile photo
Published on
Updated on

DRDO TARA kit:

ओडिशा: संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला बळकटी देणारा एक मोठा टप्पा भारताने गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने ७ मे २०२६ रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर 'टॅक्टिकल ॲडव्हांस्ड रेंज ऑगमेंटेशन' या स्वदेशी शस्त्रास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली. ही भारताची पहिली स्वदेशी 'ग्लाइड' शस्त्रास्त्र प्रणाली असून, यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे.

काय आहे 'TARA' आणि तिची वैशिष्ट्ये?

'तारा' हे एक मॉड्यूलर रेंज एक्स्टेंशन किट आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे तंत्रज्ञान एखाद्या सामान्य आणि 'अनगाइडेड' (ज्याचा मार्ग नियंत्रित करता येत नाही अशा) बॉम्बला अत्याधुनिक 'प्रिसिजन गाइडेड' (अचूक लक्ष्य भेदणाऱ्या) शस्त्रात रूपांतरित करते. या किटच्या वापरामुळे जमिनीवरील शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता आणि अचूकता कमालीची वाढते. हे देशातील पहिले 'ग्लाइड' शस्त्र आहे जे अत्याधुनिक असूनही अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आले आहे. यामुळे महागड्या क्षेपणास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल.

DRDO TARA kit
Airfare Price Hike: विमानप्रवास महागला! तिकीट दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ; पर्यटकांचे बजेट कोलमडले, वाढीचे कारण काय?

संपूर्णपणे स्वदेशी बनावट

या प्रगत प्रणालीची रचना हैदराबाद येथील 'रिसर्च सेंटर' आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळांनी मिळून केली आहे. या प्रकल्पात 'डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर्स' आणि भारतातील अनेक संरक्षण उद्योगांनी मोलाचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे, चाचणी यशस्वी होताच या उद्योगांनी आता त्याचे उत्पादनही सुरू केले आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून कौतुक

या ऐतिहासिक यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, हवाई दल आणि संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले. "भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेला एका नव्या उंचीवर नेणारे हे महत्त्वाचे पाऊल आहे," अशा शब्दांत त्यांनी या यशाचा गौरव केला. तसेच, DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही या प्रकल्पातील शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांचे कौतुक करत ही भारतासाठी एक मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

DRDO TARA kit
Vikram 21 Armoured Vehicle: ‘विक्रम 21’ चिलखती वाहनांचे अनावरण; स्वदेशी तंत्रज्ञानाचा नवा टप्पा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news