DK Shivakumar | भाजपला नडणारा आक्रमक चेहरा; 'किंगमेकर' ते कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री! जाणून घ्या कोण आहेत डी. के. शिवकुमार?

Who is DK Shivakumar | विद्यार्थी राजकारणापासून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत झेप
Who is DK Shivakumar
डी. के. शिवकुमार.Pudhari
Published on
Updated on

Who is DK Shivakumar

शिवाजी शिंदे, बेळगाव : अनेक चर्चांना पूर्णविराम देत अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या पायउतार झाले. त्या जागी डी. के. शिवकुमार यांची वर्णी लागली आहे. राज्याच्या राजकारणात डी. के. शिवकुमार यांच्या नावाला वेगळे वलय आहे. भाजपच्या राजकीय झंझावातातही विरोधी पक्षात घट्टपणे उभे राहून भाजपला नडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.देशातील श्रीमंत उद्योजक ते काँग्रेसचा दक्षिणेतील आश्वासक चेहरा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. विद्यार्थी राजकारणापासून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत त्यांनी घेतलेली झेप विस्मयजनक ठरणारी आहे. राज्याचे सर्वोच्च पद ते भूषविणार आहेत. जाणून घेवूया डी. के. शिवकुमार यांच्‍या राजकीय प्रवासविषयी...

वोक्कलिगा समाजातील एक प्रमुख नेते

दोड्डहळ्ळी केम्पेगौडा शिवकुमार म्हणजेच डी. के. शिवकुमार. त्यांचा जन्म १५ मे १९६२ रोजी कर्नाटकातील कनकपुरा येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. ते कर्नाटकातील एक प्रभावशाली राजकीय आणि सामाजिक गट असलेल्या वोक्कलिगा समाजातील एक प्रमुख नेते आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेस, निजद सरकारच्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात सिंचन मंत्री आणि सिद्धरामय्या यांच्या काळात कर्नाटक सरकारमध्ये ऊर्जा मंत्री म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त, ते कनकपुरा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात.

Who is DK Shivakumar
Karnataka CM: सिद्धरामय्या यांची राजीनाम्याची घोषणा, डी. के. शिवकुमार पदभार स्वीकारणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला

विद्यार्थी नेता ते सातनूरच आमदार...

डी. के. शिवकुमार यांनी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला एक विद्यार्थी नेता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९८४ मध्ये, ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (केपीसीसी) विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष झाले. १९८९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातनूर मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी पहिला विजय त्यांनी मिळवला. तेथून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. ते आठवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मतदारसंघात त्यांची फार मोठी लोकप्रियता आहे.

Who is DK Shivakumar
Karnataka Government News| कर्नाटकात आज होणार खांदेपालट; सिद्धरामय्या देणार राजीनामा?

कर्नाटक सरकारमध्‍ये भूषवली अनेक मंत्रिपदे

राजकीय कारकिर्दीत, शिवकुमार यांनी कर्नाटक सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी एस. एम. कृष्णा सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिले. २०१३ ते २०१८ या काळात त्यांनी सिद्धरामय्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आणि मोठे व मध्यम उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले.

Who is DK Shivakumar
DK Shivakumar : एकनिष्ठ की ‌‘एकनाथ‌’? डी. के. शिवकुमार यांनी गोवा दौऱ्यात घेतल्या भाजप नेत्यांच्या गाठी-भेटी

देशातील सर्वात श्रीमंत आमदार

डी. के. शिवकुमार हे प्रभावशाली राजकारणी आहेत. त्याचबरोबर ते देशातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जातात. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या माहितीनुसार १,४१३ कोटी रुपयांची अफाट संपत्ती त्यांच्याकडे आहे. २६५ कोटींचे त्यांच्यावर कर्ज आहे.डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. पत्नी उषा आहे.

Who is DK Shivakumar
Karnataka Politics : मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही

५० दिवसांपेक्षा अधिक काळ तिहार कारागृहात

डी. के. शिवकुमार यांची राजकीय कारकीर्द काही प्रमाणात वादग्रस्त राहिली आहे. २०१९ मध्ये त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली कारवाई करत अटक केली. ५० दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. मनी लाँड्रिंग प्रकरणाव्यतिरिक्त, शिवकुमार यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोपही झाले आहेत. २०१७ मध्ये एका सरकारी कंत्राटाच्या वाटपात त्यांनी आपले जावई अमर्त्य हेगडे यांना झुकते माप दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या वादांनंतरही शिवकुमार कर्नाटकच्या राजकारणात आपला प्रभाव आणि लोकप्रियता टिकवून आहेत. चार दशकातील राजकारणातील मुख्‍यमंत्रीपदाची 'स्‍वप्‍नपूर्ती' अवघ्‍या काही तासांनी पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news