Karnataka CM: सिद्धरामय्या यांची राजीनाम्याची घोषणा, डी. के. शिवकुमार पदभार स्वीकारणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला

Karnataka CM Change: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या सस्पेन्सला पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया राजीनामा देऊ शकतात.
Karnataka CM Change
Karnataka CM ChangePudhari
Published on
Updated on

Karnataka CM Change: कर्नाटकच्या राजकारणात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री सिद्धारमैया आज दुपारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार राज्याची धुरा सांभाळतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे कर्नाटकमधील सत्तासमीकरण पुन्हा एकदा बदलण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आज सकाळी बेंगळुरूमधील मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या एका ब्रेकफास्ट बैठकीने या चर्चांना आणखी बळ दिले. मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, डी. के. शिवकुमार यांनी सार्वजनिकरित्या सिद्धारमैया यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे दृश्य चर्चेचा विषय ठरले आहे. कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे केवळ शिष्टाचार म्हणून न पाहता एका मोठ्या राजकीय संदेशाच्या रूपात पाहिले जात आहे.

दरम्यान, सिद्धारमैया यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेदरम्यान आणखी एक घडामोड चर्चेत आली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत बेंगळुरूबाहेर असल्याने काही राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र काँग्रेसमधील सूत्रांच्या मते, राज्यपालांची अनुपस्थिती राजीनामा प्रक्रियेत अडथळा ठरणार नाही आणि नियोजित वेळेनुसार सिद्धारमैया आपला राजीनामा सादर करू शकतात.

Karnataka CM Change
RBI New Rules 2026: Loan, ATM, UPI वापरताय? RBI चे नवे नियम माहित नसतील तर होऊ शकतं नुकसान

काँग्रेससमोर सध्या केवळ मुख्यमंत्री बदलण्याचे आव्हान नाही, तर राज्यातील सामाजिक आणि राजकीय समतोल राखण्याचे मोठे आव्हान आहे. सिद्धारमैया हे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे केवळ मुख्यमंत्री नसून मोठा जनाधार असलेले नेते मानले जातात. विशेषतः AHINDA (Minorities, Backward Classes, Dalits) समीकरणावर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आला आहे.

2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयामागे हे सामाजिक समीकरण महत्त्वाचे कारण मानले गेले होते. त्यामुळे जर सिद्धारमैया यांना सत्तेपासून दूर केले गेले, तर त्यांच्या समर्थकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे काँग्रेससाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Karnataka CM Change
Vijay Wadettiwar: बँकांमध्ये पैसे गुंतवू नका, इंधनाचे दर आणखी वाढणार, लॉकडाऊनसारखी परिस्थिती; वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ

दुसरीकडे, डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद ही केवळ राजकीय बढती नसून राज्यातील नेतृत्व अधिक मजबूत करण्याची संधी मानली जात आहे. विशेषतः AHINDA मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान असणार आहे.

एकूणच, कर्नाटकमध्ये सत्ताबदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे चित्र दिसत असून, सिद्धारमैया यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news