Crime News Son Killed Mother On Diwali Morning :
दिवाशीच्या पहाटे संपूर्ण कुटुंब आनंदात असतं. सर्वजण एकत्र आलेले असतात अन् सर्वत्र चौतन्याचं वातावरण असतं. मात्र यंदाच्या दिवाळीची सकाळ चंदीगडला मात्र हादरवणारी ठरली आहे. एका ४० वर्षाच्या मुलानं आपल्या ६० वर्षाच्या आईचा निर्घृण हत्या केली.
नंतर शवविच्छेदनात या नराधम मुलानं आपल्या आईला तब्बल १९ वेळा धारदार शस्त्रानं भोसकल्याचं समोर आलं. आरोपी घटनास्थळावरून शस्त्र घेऊन पळून गेला होता. मात्र नंतर त्याला हरियाणाच्या सोनीपथ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांकडे दिला.
चंदीगडच्या सेक्टर ३९ पोलिसांनी सांगितलं की, मुळच्या उत्तराखंड येथील असलेल्या सुशिला या गेल्या काही वर्षांपासून सेक्टर ४० इथं रहायला होत्या. सुशिला यांच्या शेजारी राहणाऱ्या आकाश बैन्स यांना दिवळीदिवशी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुशिला यांच्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला.
त्यानंतर आकाश आणि त्यांचा भाऊ हे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी दरवाजा आतून लॉक होता. त्यांनी टेरेसच्या माध्यमातून घरात प्रवेश केला त्यावेळी तिथं सुशिला यांचा मुलागा रविंद्र नेगी उर्फ रवी होता. तो हातात चाकू घेऊन पळून गेला. आत गेल्यावर आकाश यांना सुशिला या रक्त्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. त्यांचा गळा कापण्यात आला होता.
त्यानंतर आकाश यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. सेक्टर ३९ चे पोलीस तिथं दाखल झाले. त्यांनी सुशिला यांचा मृतदेह GMSH-16 मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी सेक्टर ४१ मध्ये राहणाऱ्या सुशिला यांच्या मोठ्या मुलाला घटनेबाबतची माहिती दिली.
या हत्येची पहिल्यांदा माहिती देणाऱ्या आकाश यांच्या वक्तव्यानुसार पोलिसांनी रविंद्र नेगी उर्फ रवी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी हा पंजाब विद्यापीठात काम करत होता. तो मानसिकदृष्ट्या आजारी होता.
रवी यांची पत्नी आणि मुलगी त्यांच्यापासून वेगळी राहतात. सहा महिन्यापूर्वीच रवी त्याच्या आईसोबत राहण्यासाठी आला होता. त्याचे वडील १० वर्षापूर्वी वारले होते. दरम्यान, रवीला हरियाणा पोलीसांच्या मदतीनं सोनीपथ जिल्ह्यातून अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवाण्यात आली आहेत.
दरम्यान, फॉरेन्सिक टीमनं क्राईम सीनवरचे नमुने घेतले असून पोलीस या प्रकरणाचा पुढं तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवीला घरच्यांसोबत आणि आईसोबत सतत भांडण करतो म्हणून GMCH-32 रूग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.