पुढारी वृत्तसेवा
आलिया भट्ट नेहमीच तिच्या साध्या पण एलिगंट लूकसाठी ओळखली जाते
या वर्षीची दिवाळी तिने मोठ्या सेलिब्रिटी पार्टीऐवजी आपल्या बहिणी शाहीन भट्टसोबत साजरी केली
दोघींच्या या सुंदर सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत
ज्यात ती आणि शाहीन पारंपरिक पेहरावात दिसत आहेत
आलियाने पिवळा आणि पीच कलरचा आऊटफिट परिधान केला आहे
रंगाची साडी परिधान केली असून शाहीनने हलक्या गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे.
दोघींच्या हसऱ्या चेहऱ्यांनी दिवाळीचा उत्साह अधिक खुलवला आहे.