Divya Mittal: माजी IAS दिव्या मित्तल यांच्या 'जननीती भारत' पक्षाची घोषणा; २०२७ च्या यूपी निवडणुकीत उतरणार

माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या नवीन राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे.
Divya Mittal
Divya MittalFile Photo
Published on: 
Updated on: 

Divya Mittal

नवी दिल्ली: अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम देत माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या नवीन राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी 'जन नीती भारत' नावाच्या पक्षाची स्थापना केली असून, २०२७ मध्ये होणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे. सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ जारी करत त्यांनी या नव्या राजकीय पक्षाची माहिती दिली.

दिव्या मित्तल यांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, जो १४ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने मंजूर केला. राजीनाम्यानंतरच त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या नव्या पक्षाची भूमिका मांडताना त्यांनी पक्षाची 'तीन वचने' जाहीर केली असून, निर्णयप्रक्रियेत जनतेचा थेट सहभाग नोंदवणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Divya Mittal
Divya Mittal Resigns | दिव्या मित्तल

दिव्या मित्तल यांनी राजकीय पक्ष का स्थापन केला?

दिव्या मित्तल यांनी म्हटले आहे की, "मी माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करत आहे. तुम्ही विचाराल, 'काय आधीच पुरेसे राजकीय पक्ष नाहीत का?' प्रश्न पक्षांच्या कमतरतेचा नाही, तर आपले म्हणणे ऐकून घेतले जाण्याच्या अभावाचा आहे. सध्या फक्त काही मोजक्या लोकांचेच ऐकले जाते, सर्वांचे नाही. आज मी गंगेच्या काठी उभी आहे; गंगेत प्रत्येक थेंब समान असतो. कोणताही थेंब दुसऱ्यापेक्षा लहान किंवा मोठा नसतो. आणि हे थेंबच एकत्र येऊन पुढचा मार्ग ठरवतात. मला असा एक पक्ष घडवायचा आहे जिथे प्रत्येक व्यक्ती एक 'थेंब' असेल आणि प्रत्येक 'थेंब' स्वतः गंगा असेल. याच विचारातून जन्मलेल्या या पक्षाचे नाव आहे 'जननीती भारत'."

त्या पुढे म्हणाल्या, "पारंपारिक राजकारणात व्यवस्था तुमच्यावर राज्य करते; तर 'जननीती'मध्ये राज्य करण्याची सत्ता तुमच्या हातात असते. 'जननीती भारत' २०२७ ची उत्तर प्रदेश निवडणूक लढवेल हे सुनिश्चित करेल की सरकार तुमच्या इच्छेनुसार चालेल; केवळ दर पाच वर्षांनी एकदाच नव्हे, तर प्रत्येक टप्प्यावर तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल."

लंडनची कोट्यवधींची नोकरी सोडून IAS, आता राजकारणात प्रवेश

मूळच्या हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी असलेल्या दिव्या मित्तल यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी 'आयआयटी दिल्ली'मधून बी.टेक आणि 'आयआयएम बंगळूर'मधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये नामांकित 'जेपी मॉर्गन' या कंपनीत उच्च पदावर काम केले. मात्र, देशसेवेच्या ध्येयाने त्यांनी ही लंडनमधील नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि युपीएससीची तयारी सुरू केली. २०१३ मध्ये त्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्या. आता प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना त्यांनी थेट राजकारणात पाऊल ठेवले आहे.

Divya Mittal
IAS officer Divya Mittal: १३ वर्षांच्या सेवेनंतर IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा; कारण काय? भावनिक पोस्ट व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news