Dhruv Rathee: 'अटक नाही, तर माझे अपहरण झाले होते': ध्रुव राठीचा गंभीर आरोप, मध्यरात्रीनंतर सुटका

यूट्यूबर ध्रुव राठी याने गुरुग्राम पोलिसांवर गंभीर आरोप करत आपले अपहरण करण्यात आल्याचा दावा केला आहे.
Dhruv Rathee
Dhruv RatheeFile Photo
Published on: 
Updated on: 

Dhruv Rathee: गुरुग्राम : यूट्यूबर ध्रुव राठी याने गुरुग्राम पोलिसांवर गंभीर आरोप करत आपले अपहरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. “मला अटक किंवा ताब्यात घेण्यात आले नव्हते, तर माझे अपहरण करण्यात आले,” असे त्याने म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा सुटका झाल्यानंतर रविवारी व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपली भूमिका मांडली.

'सीजेपी'च्या जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी गुरुग्राम पोलिसांनी ध्रुव राठीला ताब्यात घेतले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता सेक्टर ५६ मधील केंद्रीय विहार सोसायटीतील त्याच्या निवासस्थानातून त्याला ताब्यात घेण्यात आले. रविवारी पहाटे ३ वाजता त्याची सुटका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, प्रशासनाने हे आंदोलन होऊ दिले नाही.

Dhruv Rathee
CJP protest: एक वर्ष शांततेचा भंग नको, जंतर-मंतरवर जाण्यासही बंदी; अभिजीत, सौरव आणि आशुतोष यांची कोणत्या अटींवर सुटका?

‘मी भारतीय नागरिक, मला इतरांप्रमाणेच अधिकार’

ध्रुव राठीने ‘एक्स’वरील पोस्टमधून पोलिसांना कोणतेही हमीपत्र दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, "मला अटक किंवा ताब्यात घेण्यात आले नव्हते, तर माझे अपहरण करण्यात आले होते." व्हिडिओत त्याने आपला भारतीय पासपोर्ट दाखवला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेला परदेशी नागरिक असल्याच्या वृत्तांवर टीका करताना, “मी भारतीय नागरिक आहे आणि सामान्य नागरिकाला जे अधिकार आहेत, तेच अधिकार मला आहेत,” असे त्याने सांगितले.

'गुंडांना मला उचलून नेण्यासाठी पाठवलं होतं'

राठीच्या दाव्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता तो झोपलेला असताना त्याची आई दरवाजा उघडण्यासाठी गेली. घराबाहेर अनेक जण फिरत असल्याचे तिला दिसले. हे लोक पोलिस अधिकारी नसून साध्या वेशातील व्यक्ती असल्याचा आरोप त्याने केला. सुमारे २० जण अचानक घरात घुसले आणि त्याला काही समजण्यापूर्वीच त्यांनी त्याला जबरदस्तीने बाहेर नेले, असे त्याने सांगितले. “मी आंदोलनासाठी गेलो असतो, तर मला ताब्यात घेतले असते. मात्र, मला ‘अपहरण’ हा शब्द वापरावा लागत आहे, कारण ही अटक नव्हती. गुंडांना मला उचलून नेण्यासाठी पाठवण्यात आले होते,” असा आरोप राठीने केला.

‘मला फरफटत नेले, शरीरावर जखमा’

घरातून जबरदस्तीने बाहेर नेण्यात आल्याचा दावा करताना राठी म्हणाला की, त्याला खोलीतून फरफटत नेण्यात आले आणि जिन्यावरून खाली आणण्यात आले. या प्रकारात त्याला दुखापत झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याचेही त्याने सांगितले. वकिलाला भेटण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्याने केला. कायद्याचे उल्लंघन न केलेल्या आणि देशाच्या हितासाठी सत्याची बाजू मांडणाऱ्या सामान्य नागरिकाला घरातील खोलीतून जबरदस्तीने उचलून नेणे, त्याच्या पालकांना मारहाण करणे आणि अशा प्रकारे घेऊन जाणे, हे कोणत्या लोकशाही देशात घडते, असा सवाल त्याने उपस्थित केला.

ही परिस्थिती म्हणजे "अघोषित आणीबाणी" असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर "देशाचे हुकूमशाहीत रूपांतर करत असल्याचा" आरोप केला. “माझ्यासोबत असे घडू शकते, तर तुमच्यासोबतही घडू शकते. याचा विचार करा. सध्या मी ठीक आहे,” असे तो म्हणाला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची सुटका न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचेही त्याने आभार मानले. “माझा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरी मी देशासाठी अशाच प्रकारे आवाज उठवत राहीन. जय हिंद,” असे त्याने स्पष्ट केले.

Dhruv Rathee
BJP on CJP protest : 'देशाचा कारभार संसदेतून चालतो, रस्त्यांवरून नाही': CJP निदर्शनांवरून भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news