Dharmendra Pradhan: शिक्षणमंत्री राजीनामा देणार? CJPच्या आंदोलनादरम्यान अमित शाह-धर्मेंद्र प्रधान यांची सीक्रेट बैठक

Dharmendra Pradhan: CJPच्या 'चलो संसद' आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Dharmendra Pradhan met Amit Shah
Dharmendra Pradhan met Amit Shah Pudhari
Published on
Updated on

Dharmendra Pradhan: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण, स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन अधिक तीव्र झाले असतानाच मोठी राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा नेमका अजेंडा अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, CJPने आयोजित केलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान दिल्लीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलक मोठ्या संख्येने संसद परिसराच्या दिशेने निघाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला आहे.

संसद परिसरात सुरक्षा

मोर्चादरम्यान आंदोलक रेल भवनापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काहीशे मीटर अंतरापर्यंत आंदोलक पोहोचल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संसदेच्या दक्षिण प्रवेशद्वारासह काही प्रवेशमार्ग तात्पुरते बंद करण्यात आले.

रेल भवन, ट्रान्सपोर्ट भवन, विजय चौक, रायसीना रोड आणि संसद परिसरात सीआरपीएफ, निमलष्करी दल आणि संसद सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांना जवळपास दीड तास प्रयत्न करावे लागल्याचे सांगितले जात आहे.

Dharmendra Pradhan met Amit Shah
AISA hunger strike : तीन विद्यार्थ्यांचे २३ दिवसांनंतर उपोषण मागे; आता सोनम वांगचुक यांच्या भूमिकेकडे लक्ष

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले

पेपरफुटी प्रकरणावर उपोषण करणारे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dharmendra Pradhan met Amit Shah
CJP Parliament March: 'सरकार अखेर चर्चेला तयार', संसद मोर्च्यादरम्यान CJPचा मोठा दावा; जे.पी. नड्डांसोबत होणार निर्णायक बैठक

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

CJPकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असली, तरी ते राजीनामा देणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीनंतर या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या भेटीचा संबंध राजीनाम्याशी आहे की अन्य कोणत्या प्रशासकीय किंवा राजकीय विषयाशी, याबाबत सरकारकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news