Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नीची छेड काढल्याच्या संशयावरून मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

चिकलठाणा हद्दीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले
Crime News |
crime newsPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरालगतच्या कच्ची घाटी परिसरात सोमवारी (दि. २५) एका अज्ञात तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. मृताचे नाव शेख आवेश शेख परवेज (२५, रा. कसबा चौक, जालना, ह.मु. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फूटपाथ) असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत या खुनाचा उलगडा केला.

पत्नीवर वाईट नजर ठेवून तिची छेड काढणाऱ्या मित्राचाच दारूच्या नशेत दगडाने ठेचून निघृण खून केल्याचे समोर आले आहे. शेख नं. ४, रेहमानिया कॉलनी, किरडपुरा) असे या अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी गुरुवारी (दि.२८) दिली.

Crime News |
Dhule Murder | साक्री तालुक्यात तरुण आणि तरुणीची वेगवेगळ्या ठिकाणी खून, भोंदू गिरीतून हत्याकांड?

फैयाज शेख महमूद (२६, रा. गल्ली अधिक माहितीनुसार, संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मात्र पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. एलसीबीच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. अगोदर मृताचे नाव शेख आवेश असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सोमवारी सकाळी मृत आवेश हा त्याचा मित्र फैयाजसोबत स्कूटीवरून गेल्याचे तपासात उघड झाले.

यावरून मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात २७ मे रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी संशयित फैयाजला त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, निरीक्षक विजयसिंह राजपूत, चिकलठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उपनिरीक्षक महेश घुगे, श्रीनिवास धुळे, अंमलदार कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, बलवीर बहुरे, शिवाजी मगर, निलेश कुडे यांच्या पथकाने केली.

घटनेच्या दिवशी काय घडले ?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी फैयाज सेंट्रिंगचे काम करतो. तर आवेश फुटपाथवर राहत होता. तो आरोपीच्या पत्नीची छेड काढायचा. त्यावरून फैयाजचा त्याच्यावर राग होता. २५ मे रोजी सकाळी दोघेही स्कूटीवरून अगोदर शहागंज, तेथून नारेगाव चौफुली कचरा पट्टीजवळ गेले. त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी ८ ते साडेआठच्या सुमारास दोघांनी मद्यपान आणि बटनची नशा केली. तिथे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले.

Crime News |
Sambhajinagar Death Case Update: 2009 पासूनचे संबंध, 36 लाखांची वसुली... एकत्र राहण्याचा अट्टाहास; पत्नीचा गेला नाहक बळी

रागाच्या भरात फैयाजने आवेशच्या डोक्यात दगडाचे घाव घातले. आवेश चक्कर येऊन पडला. काही वेळाने पुन्हा तो उठला. तेथून दोघेही पुन्हा स्कूटीवरून कच्चीघाटी परिसरात आले. तिथे आवेश स्कूटीवरून उतरताच कोसळला. तो पुन्हा उठलाच नाही. त्यानंतर फैयाज घरी निघून गेला. या प्रकरणाचा पुढील तपास चिकलठाणा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news