Delhi building collapse: दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात इमारत कोसळली; ३ ठार

आतापर्यंत ९ जणांना बाहेर काढण्यात यश
Delhi building collapse
Delhi building collapseFile Photo
Published on
Updated on

Delhi building collapse

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी शिवमंदिराजवळ एक इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी ३ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन दलाला दुपारी सुमारे १.३३ वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. ही पथके सुमारे १.५० वाजता घटनास्थळी पोहोचली.

Delhi building collapse
Sudivya Kumar Sonu passes away: झारखंडचे कॅबिनेट मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

घटनास्थळी सर्च अँड रेस्क्यू टीम, ब्रीदिंग अपॅरेटस युनिट तसेच वॉटर बाऊझर पथके तैनात करण्यात आली आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असून, अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीतील खोल्या विद्यार्थ्यांना भाड्याने राहायला दिल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकांसोबतच स्थानिक नागरिकही ढिगारा हटवण्याच्या आणि लोकांना बाहेर काढण्याच्या कामात मदत करत आहेत.

NSUI ची सरकारवर कडक टीका

भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाने या घटनेवरून सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, "दिल्ली विद्यापीठाच्या साउथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन भागात इमारत कोसळल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबतची निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. दिल्ली विद्यापीठ प्रशासन आणि सरकारने तातडीने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू करावे, प्रत्येक विद्यार्थी आणि व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढावे, या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी," अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news