Sudivya Kumar Sonu passes away: झारखंडचे कॅबिनेट मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Sudivya Kumar Sonu
Sudivya Kumar SonuFile Photo
Published on
Updated on

Sudivya Kumar Sonu passes away

गिरिडीह: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे शनिवारी रात्री उशिरा गिरिडीह येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गिरिडीह येथील निवासस्थानी असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने गिरिडीह येथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेले; मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

Sudivya Kumar Sonu
Manmohan Singh memorial: अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक

मंत्री सोनू यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी रांचीला हलवणे शक्य झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच गिरिडीह प्रशासनाचे अधिकारी आणि मंत्र्यांचे समर्थक रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने जेएमएम कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

गिरिडीहचे आमदार

सुदिव्य कुमार सोनू हे गिरिडीह विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा गिरिडीह सदर जागा जिंकली होती. त्यानंतर, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि हेमंत सोरेन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भूषवले. त्यांच्याकडे पर्यटन, कला, संस्कृती, क्रीडा आणि युवा व्यवहार, तसेच नगरविकास आणि उच्च व तांत्रिक शिक्षण या विभागांची जबाबदारी होती. भारतीय जनता पक्षाच्या निर्भय शाहाबादी यांचा पराभव करून ते सलग दुसऱ्यांदा गिरिडीहचे आमदार बनले होते आणि त्यानंतर मंत्री झाले होते. गांडेय विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या विजयात मंत्री सोनू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सांगितले जाते.

झारखंड मुक्ती मोर्चाकडून श्रद्धांजली

झारखंड मुक्ती मोर्चाने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून मंत्री सुदिव्य कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जे सहकारी कालपर्यंत आपल्यासोबत होते, ते आता केवळ आपल्या आठवणींतच उरले आहेत. जीवनाच्या अनिश्चिततेने आपल्याला पुन्हा एकदा अतीव दुःख आणि शोकाकुल अवस्थेत टाकले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे निष्ठावान सदस्य आणि झारखंड सरकारमधील मंत्री सुदिव्य कुमार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण JMM परिवार हादरला आहे. त्यांचे जाणे ही पक्ष, सरकार आणि झारखंड राज्यासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांचा संघर्ष, सेवा आणि योगदान सदैव स्मरणात राहील."

Sudivya Kumar Sonu
Cancer: पाठदुखीला वाढत्या वयामुळे समजू नका; ठरू शकते कॅन्सरचे पहिले लक्षण!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news