CJP Delhi protest: अभिजित दीपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

दिल्लीतील आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्ष नेहा बोरा यांची आज पहाटे सुटका करण्यात आली आहे.
Neha Bora, Abhijeet Dipke
Neha Bora, Abhijeet DipkeFile Photo
Published on: 
Updated on: 

CJP Delhi protest

नवी दिल्ली: दिल्लीतील आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्ष नेहा बोरा यांची आज पहाटे सुटका करण्यात आली आहे, तर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडून शनिवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. या दोन्ही नेत्यांना शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना नेहा बोरा यांनी प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. "देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात असून, हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.

Neha Bora, Abhijeet Dipke
CJP Abhijeet Dipke: ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं...; सीजेपीला स्वकीयांचाच सर्वात मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

पुढे बोलताना बोरा म्हणाल्या, "नागरिकांना दिवस-रात्र ताब्यात ठेवून दुसऱ्या दिवशी सोडले जात आहे. हे कोणत्या कायद्यानुसार योग्य आहे? विशेषतः महिलांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवता येत नाही आणि सोडायचे असल्यास ते नियमांनुसार केले पाहिजे, मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे."

"मध्य दिल्लीत ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे. कामावर जाणाऱ्या लोकांना रस्ते बंद असल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवून 'एसआयआर' तात्काळ रोखण्यात यावे, जेणेकरून नागरिकांचे मतदानाचा हक्क आणि शांतता अबाधित राहील," अशी मागणीही बोरा यांनी केली.

पोलिसांच्या वर्तनावर ताशेरे ओढताना बोरा म्हणाल्या की, पोलिसांकडून नाव आणि पत्त्याची विचारपूस करण्यात आली, मात्र बराच वेळ वकील किंवा सहकाऱ्यांशी संपर्क साधू दिला नाही. सुमारे ५ ते ६ तास वकिलांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुठे भेटीची परवानगी देण्यात आली. पोलिसांची अशी दडपशाहीची भूमिका ही नवी नसून ती अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Neha Bora, Abhijeet Dipke
CJP Delhi Protest: दिल्ली आंदोलनावरून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मागितली माफी; इंटरनेट बंद करण्यामागचं कारण अखेर सांगितलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news