

Delhi Terror Plot Foiled: दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. एनडीआरने पाकिस्तानी आएसआय आणि मुंबई अंडरवर्लड नेटवर्कच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या ९ आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी दिल्लीतील महत्वाची ठिकाणे, सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी यांच्याकडून अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आयएसआय आणि अंडरवर्ल्डशी संबंधित ९ जणांना दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करण्याचं काम दिलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आम्ही हे ऑपरेशन लाँच केलं होतं. या ऑपरेशन अंतर्गत या ९ लोकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मॉड्युलवर पोलिसांची नजर होती.
अटक केलेल्या ९ आरोपी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा, इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित हँडलर म्हणून काम करत होते. त्यांना दिल्लीत संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्याचं काम दिलं होतं.