Delhi Protest Fake News: दिल्लीच्या आंदोलनात पाकिस्तानचाही रस... फेक पोस्ट प्रकरणी ४ FIR दाखल, २०० पोस्ट डिलीट

दिल्ली पोलीसांच्या तपासात सीमेपलीकडून भारत विरोधी भावना भडवण्याची आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
Delhi Protest Fake News
Delhi Protest Fake Newspudhari
Published on: 
Updated on: 

Delhi Protest Fake News: देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही महिन्यापासून जोरदार आंदोलने सुरू आहेत. मात्र या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. दिल्ली पोलीसांच्या इंटेलिजेन्स फ्युजन अँड स्ट्रॅडेजिक ऑपरेशन युनिटने चुकीचे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या आणि राजधानीतील वातावरण खराब करणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सविरूद्ध चार FIR दाखल केल्या आहेत.

Delhi Protest Fake News
Delhi Protest Crackdown SC Hearing: जज साहेबांची तब्येत बिघडली.. SC ने दिल्ली आंदोलन क्रॅकडाऊन प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

दिल्लीत २७३ कंपन्या तैनात करण्याची विनंती

मिळालेल्या माहितीनुसार आंदोलन आणि सणासुदीचा काळ पाहून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी गृह मंत्रालयाकडे दिल्लीत २७३ तुकड्या तैनात करण्याची विनंती केली आहे. दिल्ली पोलिसांनी खोट्या पोस्टबाबत चार एफआयआर दाखल केल्या आहेत.

तसेच दिल्ली पोलिसांनी २०० पेक्षा जास्त खोट्या आणि तथ्य नसलेल्या पोस्ट हटवल्या आहेत. पाकिस्तानमधील सोशल मीडिया हँडलसह जवळपास खोटी वक्तव्ये पसरवण्याचे आरोप करण्यात आलेली १०० सोशल मीडिया हँडल पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केलेली प्रकरणे ही बाराखंबा आंदोलनासंदर्भातील आहेत.

Delhi Protest Fake News
Congress Delhi Protest: राहुल गांधींच्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे नेते दिल्लीत रस्त्यावर

दिल्ली आंदोलनात पाकिस्तानचा रस

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलीसांच्या तपासात सीमेपलीकडून भारत विरोधी भावना भडवण्याची आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यात पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्स जास्त सक्रीय आहेत.

१० ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या ऑनलाईन प्रपोगंडा मोहिमेअंतर्गत पाकिस्तानमधून ऑपरेट करणाऱ्या काही युजर्सनी कथित स्वरूपात भारतीय नाव ठेवून दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत. लोकांना या पोस्ट भारतातूनच केल्या आहेत असं भासवलं जात आहे.

Delhi Protest Fake News
CJP Delhi Protest : अखेर गृह मंत्रालय नरमले, दिल्‍लीत आंदोलन परवानगी;मात्र जंतर मंतरवरील 'नो एन्‍ट्री' कायम

२०० सोशल मीडिया पोस्ट हटवल्या

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबरपासून आंदोलकांच्या मृत्यूची खोटी बातमी या हँडल्सवरून पसरवली जात आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये अशांतता पसरवण्यासाठी केलेल्या २०० पेक्षा जास्त सोशल मीडिया पोस्ट आतापर्यंत हटवण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणी सायबर सेलची मदत घेत आहे. यात पाकिस्तानी अँगल देखील तपासला जात आहे.

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर सावधगिरी बाळण्याचा सल्ला देखील दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या आणि खोटी माहिती पसरवणाऱ्यांच्या प्रपोगंडाला बळी पडू नका असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news