Delhi Protest Crackdown SC Hearing: जज साहेबांची तब्येत बिघडली.. SC ने दिल्ली आंदोलन क्रॅकडाऊन प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

या याचिकेत आंदोलकांची अटक, त्यांना ताब्यात घेण, इंटरनेट बंद करणं, मेट्रो, रेल्वे सेवा बंद करणं या मुद्द्यांचा देखील समावेश आहे.
Delhi Protest Crackdown SC Hearing
Delhi Protest Crackdown SC Hearingpudhari
Published on: 
Updated on: 

Delhi Protest Crackdown SC Hearing: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरूद्धच्या आंदोलनाबाबच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने १५ ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकलली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतर परिसरात सुरू करण्यात आलं होतं. यासंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.

Delhi Protest Crackdown SC Hearing
Congress Delhi Protest: राहुल गांधींच्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे नेते दिल्लीत रस्त्यावर

या याचिकेत आंदोलकांची अटक, त्यांना ताब्यात घेण, इंटरनेट बंद करणं, मेट्रो, रेल्वे सेवा बंद करणं या मुद्द्यांचा देखील समावेश आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे जज व्ही मोहना यांची प्रकृती बिघडल्यामुळं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्या बराचकाळ या प्रकरणी सुनावणी घेऊ शकल्या नाहीत.

Delhi Protest Crackdown SC Hearing
CJP Delhi protest : दिल्लीत 'सीजेपी'चे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; १०० हून अधिक जणांना घेतले ताब्यात

पोलिसांना नोटीस

दिल्ली आंदोलनाबाबतच्या याचिकेची सुनावणी ही चीफ जस्टीस सूर्यकांत जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांचा बेंच करत आहे. याबाबत १२ पेक्षा जास्त याचिका दोन्ही बाजूंकडून दाखल झाल्या आहेत. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीनंतर जस्टीस मोहना बरे होत नाहीत तोपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. याचबरोबर न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि इतर प्रशासकीय संस्थांना या प्रकरणी त्यांचे उत्तर देण्यासाठी बुधवार सायंकाळपर्यंत वेळ दिला आहे. ही नोटीस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले नाही म्हणून बजावण्यात आली होती.

राहुल गांधींच्या याचिकेवर त्याचवेळी सुनावणी

याचबरोबर काँग्रेसने दाखल केलेली नवी याचिका गुरूवारी घेण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं. ही याचिका दाखल करताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळं या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या १० नेत्यांनी ही याचिका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेत मोठा गोंधळ असल्याचा आरोप केला आहे. ही याचिका देखील इतर याचिकांसोबतच सुनावणीसाठी घेतली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news