

नवी दिल्ली: दिल्ली महानगरपालिकेच्या १२ प्रभागांमध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजपला धक्का बसला असून काँग्रेसचे खाते उघडले तर आम आदमी पक्षाने आपल्या जागा कायम राखल्या. भाजपने सात आणि ‘आप’ने तीन तर काँग्रेस आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने प्रत्येकी एका प्रभागामध्ये विजय मिळवला. यापूर्वी १२ पैकी ९ प्रभाग भाजप आणि ३ आम आदमी पक्षाकडे होते. त्यामुळे भाजपला २ जागांचे नुकसान झाले आहे.
दिल्ली महानगरपालिकेत फेब्रुवारी २०२५ मध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या या पहिल्या निवडणुकीत पक्षाला २ जागांचे नुकसान झाल्याने धक्का बसल्याचे मानले जात आहे. या १२ प्रभागांमध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.
भाजपने जिंकलेले ९ प्रभाग
चांदणी चौक- सुमन कुमार गुप्ता
शालीमार बाग बी- अनिता जैन
द्वारका बी- मनीषा देवी
विनोद नगर- सरला चौधरी
अशोक विहार- वीणा असिजा
ग्रेटर कैलाश- अंजुम मंडल
दिचाओं कलान- रेखा राणी
आपचे उमेदवार विजयी झालेले प्रभाग
दक्षिण पुरी - राम स्वरूप कनोजिया,
मुंडका - अनिल
नारायणा - राजन अरोरा
संगम विहार अ प्रभागातून काँग्रेसचे सुरेश चौधरी विजयी झाले. तर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे मोहम्मद इम्रान यांनी चांदणी महल प्रभागातून विजय मिळवला.