Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या, खासदारांची गडकरींकडे मागणी

लाखो अनुयायांच्या भावनांचा सन्मान करण्याची अपेक्षा; नितीन गडकरींकडून सकारात्मक प्रतिसाद
toll
toll Pudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नितीन गडकरींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खासदार कल्याण काळे म्हणाले.

toll
Shivraj Singh Chouhan: महाराष्ट्राने शेतकऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव पाठवला की नाही, कृषिमंत्र्यांनी अखेर लोकसभेत स्पष्टच सांगितले

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड, खासदार कल्याण काळे, खासदार शिवाजी काळगे, खासदार रवींद्र चव्हाण यांच्या शिष्टमंडळांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. या यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही एका शिष्टमंडळाद्वारे नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले की, देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात.

toll
Nawale Bridge Pune | पुण्यातील 'नवले पुलाला उच्च दुर्घटना क्षेत्र म्हणून घोषित करा': शिवसेना खासदारांची लोकसभेत मागणी

त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात यावी तसेच ही मागणी फक्त आर्थिक मदतीची नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कोट्यावधी अनुयायांच्या भावनांचा सन्मान करणारी आहे. आमच्या या मागणीवर नितीन गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news