Aniruddhacharya: अनिरुद्धाचार्य यांच्यावर मीम्स आणि व्हिडिओ बनवता येणार नाहीत; न्यायालयाचा मोठा निर्णय, काय आहे प्रकरण?

Delhi HC: दिल्ली उच्च न्यायालयने अनिरुद्धाचार्य यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण करत महत्त्वाचा निर्णय दिला. त्यांचे नाव, आवाज आणि प्रतिमेचा वापर करून मीम्स, व्हिडिओ तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Aniruddhacharya
AniruddhacharyaPudhari
Published on
Updated on

Delhi HC Protects Personality Rights: सोशल मीडियावर वाढत्या मीम्स, डीपफेक आणि एआय कंटेंटच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक प्रवचक अनिरुद्धाचार्य उर्फ ‘पूकी बाबा’ यांच्या हक्कांचे संरक्षण करत त्यांचे नाव, आवाज आणि प्रतिमेचा अनधिकृत वापर करण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.

न्यायालयाचा आदेश काय सांगतो?

न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज किंवा फोटो वापरून तयार केलेले मीम्स, व्हिडिओ किंवा एआय-आधारित डीपफेक कंटेंट तयार करणे बेकायदेशीर आहे. न्यायालयाने हेही नमूद केले की हा प्रकार केवळ ‘मस्करी’ किंवा ‘पॅरोडी’च्या मर्यादेत राहत नाही, तर तो व्यक्तीच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारा आणि बदनामी करणारा ठरू शकतो.

सोशल मीडिया कंपन्यांना निर्देश

या प्रकरणात न्यायालयाने Meta, Google आणि X यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना संबंधित आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रतिष्ठेला धोका, न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या कंटेंटमुळे संबंधित व्यक्तीच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अनिरुद्धाचार्य यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, काही लोक त्यांच्या नावाचा वापर करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या नावाशी संबंधित खोट्या जाहिराती व भ्रामक मेसेज पसरवले जात आहेत.

Aniruddhacharya
Sachin Tendulkar Ban: ‘क्रिकेटच्या देवावर’ झाला होता फसवणुकीचा आरोप; सचिनवर बंदी का घालण्यात आली होती?

आध्यात्मिक संदेशांवरही परिणाम

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक शिकवणींचे चुकीचे सादरीकरण केले जाते. वकिलांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये त्यांच्या विचारांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जात असून त्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

याआधीही अनेक सेलिब्रिटींना संरक्षण

या आधीही ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, गौतम गंभीर आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या हक्कांसाठी न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांनाही दिलासा मिळाला होता.

Aniruddhacharya
Iran-US War : होर्मुझच्या समुद्रधुनीत इराणला झटका, ओमानच्या किनाऱ्यावरून 3 महाकाय जहाजांचा प्रवास; नव्या सागरी मार्गाचा शोध

कलाकारांचेही मत

प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, एखाद्या कलाकाराच्या नावाचा किंवा कामाचा वापर केल्यास त्यासाठी योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. ‘पूकी बाबा’ प्रकरणातील हा निर्णय डिजिटल युगात व्यक्तीच्या हक्कांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे. सोशल मीडिया आणि एआयच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांमध्ये हा निर्णय महत्त्वाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news