CJP Delhi 5 September Protest: दिल्लीत पुन्हा कॉकरोच धडकणार... ५ सप्टेंबरला शांतीपूर्ण मोर्चा; काय आहेत मागण्या?

CJP Delhi 5 September Protest: 'सीजेपी' (CJP) कडून आगामी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका भव्य शांततापूर्ण मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे.
CJP Delhi 5 September Protest
CJP Delhi 5 September Protestpudhari
Published on
Updated on

CJP Delhi 5 September Protest: २५ जुलै रोजी सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याचा गंभीर आरोप करत 'सीजेपी' (CJP) कडून आगामी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका भव्य शांततापूर्ण मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे.

CJP Delhi 5 September Protest
Abhijit Dipke Hingoli News : पिंपळदरीची शाळा देश पातळीवर नेणार; अभिजीत दिपके

इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, यादरम्यान सरकारला दिलेला शब्द पाळण्याची कडक मागणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, नीट (NEET) परीक्षेतील पीडितांचे कुटुंबीय तसेच पोलीस अत्याचाराचे बळी ठरलेले नागरिक या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

आंदोलनातील मुख्य मागणी काय आहे?

२५ जुलै रोजी जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेताना सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

CJP Delhi 5 September Protest
CJP Instagram Account Blocked: स्वातंत्र्य दिनालाच कॉक्रोज जनता पार्टीच्या इन्स्टा अकाऊंटला लागलं टाळं... अभिजीत दिपके जाम भडकले

तत्पूर्वी, १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरची यादी मागितली असतानाही सरकारने यावर कोणतेही स्पष्ट आश्वासन दिलेले नाही, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर न्याय मागण्यासाठी विद्यार्थी, विविध युवा संघटना आणि देशभरातील तरुण वर्गाने ५ सप्टेंबरच्या या मोर्चान्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या इतर साथीदारांनी दरम्यानच्या काळात स्कूल ठीक करो हे आंदोलन सुरू केलं होतं. अभिजीत महाराष्ट्रातील तर रांका हे राजस्थानमधील सरकारी शाळांच्या दुरावस्थेबाबत काम करत होते.

मात्र जयपूरमध्ये अशाच एका सरकारी शाळेची पहाणी करायला गेल्यावर आशुतोष रांका आणि त्यांच्या साथीदारांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर दिपके यांनी जर राजस्थान सरकारने ज्यांनी हल्ला केला त्यांना ताब्यात घेतलं नाही आणि शाळा ठीक केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी देखील दिल्ली आंदोलनावेळी पॅलेट गनच्या छऱ्यांनी जखमी झालेल्या तरूणाची एफआयआर दिल्ली पोलीस दाखल करून घेत नव्हते म्हणून ठिय्या आंदोलन केले होते. अखेर लोकसभा विरोधीपक्ष नेत्याने अनेक तास पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या दिल्यानंतर पीडित तरूणाची एफआयआर दाखल करून घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news