CJP Instagram Account Blocked: स्वातंत्र्य दिनालाच कॉक्रोज जनता पार्टीच्या इन्स्टा अकाऊंटला लागलं टाळं... अभिजीत दिपके जाम भडकले

CJP Instagram Account Blocked
CJP Instagram Account BlockedPUDHARI
Published on
Updated on

CJP Instagram Account Blocked: कॉक्रोज जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर स्वातंत्र्य दिनालाच टाळं लागलं आहे. CJP फाऊंडर अभिजीत दिपके यांनी स्वतः याची माहिती दिली. त्यांनी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर केली. त्यांनी पेज ब्लॉक करणाऱ्यांना 'डरपोक' देखील म्हंटल.

CJP Instagram Account Blocked
Abhijeet Dipke Police Controversy: दिपकेंनी माफी मागावी नाहीतर हात उपसले जातील... महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आक्रमक

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी सीजेपी फाऊंडर अभिजीत दिपके यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यात त्यांनी एक फोटो शेअर करून, कॉक्रोज जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल हटवलं आहे. किती घाबरलेले आहेत बघा असे कॅप्शन दिले.

CJP Instagram Account Blocked
Abhijeet Dipke Video: 'तुम्ही बाहेर जा, तुम्हाला काय...?', अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद, PSIला घराबाहेर काढलं

यापूर्वी अभिजत दिपके यांनी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासाठी त्यांनी एका खास फोटोची निवड केली होती. त्यांनी नीट पेपर लीग आंदोलनावेळी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा एका फोटो शेअर केला. या फोटोखाली त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा... हा फोटो आपल्याला अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे याची आठवण करून देणारा आहे असं सांगितलं.

CJP Instagram Account Blocked
Abhijeet Dipke: पंतप्रधान मोदींच्या हातमाग दिनाच्या व्हिडिओवर अभिजित दिपकेंची अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाले...

सीजेपीची शाळा सुधारणा मोहीम

सीजेपीच्या आवाहनावर देशातील हजारो तरूणांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं. आता या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीची टीम ही देशभरात गावातील शाळा सुधारणा मोहीम हाती घेणार आहे. अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी सांगितलं की सीजेपीकडून स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या गावातून शाळा सुधारणा मोहीम सुरू होणार आहे. या मोहीमेचा उद्येश हा ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या पायाभूत व्यवस्थेत सुधारणा करणे आणि त्यासाठी जबाबादारी निश्चित करणे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news