आईशी वादातून तिसऱ्या मजल्यावरून फेकला भरलेला गॅस सिलिंडर; खाली उभ्या तरुणाचा मृत्यू

शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
delhi crime news
आईशी वादातून तिसऱ्या मजल्यावरून फेकला भरलेला गॅस सिलिंडर; खाली उभ्या तरुणाचा मृत्यूfile photo
Published on: 
Updated on: 

delhi after argument with mother man threw gas cylinder from third floor youth standing below died

पुढारी ऑनलाईन : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील बिंदापूर परिसरात आईसोबत झालेल्या वादातून तिसऱ्या मजल्यावरून फेकलेला भरलेला एलपीजी सिलिंडर ३० वर्षीय साहिल याच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत साहिलचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यावेळी साहिल इमारतीच्या बाहेर उभा होता.

delhi crime news
Jagannath Temple : ४८ वर्षानंतर उघडला जगन्नाथ मंदिराचा रहस्यमयी खजिना, अद्याप ३ पेट्यांचे गुढ कायम

दक्षिण-पश्चिम दिल्लीतील बिंदापूर परिसरात एका व्यक्तीचे त्याच्या आईसोबत भांडण सुरू असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून कथितरीत्या भरलेला एलपीजी सिलिंडर खाली फेकण्यात आला. हा सिलिंडर ३० वर्षीय साहिल याच्या डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास तालाब वाला पार्क परिसरात ही घटना घडली. त्यावेळी साहिल इमारतीच्या बाहेर उभा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून अचानक सिलिंडर खाली पडला आणि थेट साहिलच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला प्रथम जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला दीनदयाळ उपाध्याय (डीडीयू) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दारू पिऊन वारंवार घालायचा गोंधळ

या घटनेप्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या मालकाच्या पुतण्या शिवम शर्मा याला ताब्यात घेतले आहे. आईसोबत वाद सुरू असताना शिवमने बाल्कनीतून सिलिंडर खाली फेकल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवम अनेकदा दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. याबाबत इमारतीच्या मालकाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या.

delhi crime news
Diljit Dosanjh Concert : 'बॉम्ब फेकाल, तरीही माझ्याकडून प्रेमच मिळेल', धमक्यांच्या सावटात मुंबईत कॉन्सर्ट, दिलजीतचा प्रेमाचा संदेश

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी शिवम आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने सिलिंडर खाली फेकला. हा सिलिंडर जाणूनबुजून फेकण्यात आला होता की वादादरम्यान चुकून खाली पडला, याचा तपास पोलीस करत आहेत. साहिल हा याच इमारतीच्या तळमजल्यावर पत्नी आणि एक वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.