Delhi crime news: मित्राने भेटायला बोलावले, ४ जणांनी शरीराचे लचके तोडले, नंतर चाकूने...; दिल्लीत १६ वर्षीय मुलीची हत्या

दिल्लीत एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या १७ वर्षीय मित्रासह चार जणांना ताब्यात घेतले आहे.
crime news
crime newsFile Photo
Published on
Updated on

Delhi crime news

नवी दिल्ली: दिल्लीच्या बाह्य उत्तर भागात एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या १७ वर्षीय मित्रासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमांमध्ये दोघांचे वय १७, एकाचे १६ आणि एकाचे १९ वर्षे आहे. घटनेनंतर कुजलेल्या स्थितीत असलेला मुलीचा मृतदेह एका मोकळ्या शेतात आढळून आला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लावला छडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयंकर घटना १० सप्टेंबरच्या रात्री घडली. पीडित मुलगी तिच्या १७ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या मुलाने आपल्या तीन साथीदारांना बोलावले. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याने आरोपींनी तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला.

crime news
Ahilyanagar Crime News: तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्राला मारहाण करत निर्जनस्थळी नेऊन कृत्य, दोघांना अटक

१२ आणि १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री एका शेतात मृतदेह पडल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. गुन्ह्याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

पोलिसांनी तांत्रिक तपासाचा धागा पकडत परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यादरम्यान घटनास्थळाजवळून एक टेम्पो जाताना दिसून आला. पोलिसांनी त्या टेम्पोच्या मालकाशी संपर्क साधला; त्याने पोलिसांना सांगितले की, त्या रात्री त्याच्या एका मित्राने तो टेम्पो नेला होता.

हाच धागा पकडून १५-१६ सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून पोलिसांनी संशयित टेम्पोचा चालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चौघांचाही सहभाग असल्याची माहिती उघड झाली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चाकू जप्त केले आहेत.

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (POCSO) कलम ६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. एका आरोपीने गुन्ह्यात सहभाग नसल्याचा दावा केला असला, तरी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यावरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या भीषण गुन्ह्यामागील संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्यासाठी आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

crime news
Crime News: ‘दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलते...’; संशयाच भूत डोक्यात शिरलं अन् झोपेत असलेल्या पत्नीचं मुंडकं तोडलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news