CRPF jawan Pakistani wife | पाकिस्तानी तरूणीशी विवाह; CRPF जवान म्हणाला, मी तर...

पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्यामुळे CRPF जवानाला बडतर्फ केले आहे. यावर CRPF जवानाने खुलासा केला आहे.
CRPF jawan Pakistani wife
CRPF jawan Pakistani wife file photo
Published on
Updated on

CRPF jawan Pakistani wife

दिल्ली : पाकिस्तानमधील तरूणीशी विवाह केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानाने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. लग्न करण्यापूर्वी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) मुख्यालयातून परवानगी घेतली होती आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच विवाह केला, असे बडतर्फ सीआरपीएफ जवान मुनीर अहमद याने स्पष्ट केले आहे.

CRPF jawan Pakistani wife
सीमेवर तणाव : सैन्याला दारूगोळा पुरवणाऱ्या कारखान्यांच्या सुट्ट्या रद्द, कर्मचाऱ्यांना तात्‍काळ कामावर रूजू होण्याचे आदेश

पाकिस्तानी तरूणीशी लग्न केल्याची माहिती लपवल्याबद्दल सीआरपीएफ जवान मुनीर अहमद याला शनिवारी सेवेतून काढून टाकण्यात आले. एका एजन्सीशी बोलताना मुनीर याने हे आरोप फेटाळले आहे. मला माझ्या बडतर्फीची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली. यानंतर लगेचच, मला सीआरपीएफकडून एक पत्र मिळाले, ज्यामध्ये मला माझ्या बडतर्फीची माहिती देण्यात आली. हे पत्र मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का देणारे होते. पण मी पाकिस्तानी मुलीश लग्न करण्यासाठी मुख्यालयाकडून परवानगी मागितली होती आणि मला परवानगी देण्यात आली. त्यानंतरच माझं लग्न झालं, असे मुनीर याने म्हटले आहे.

CRPF चे आरोप काय आहेत?

CRPF च्या माहितीनुसार, मुनीरने पाकिस्तानी नागरिक मीनल खान हिच्याशी विवाहाची माहिती लपवली, तसेच तिचा व्हिसा संपल्यानंतरही तिला भारतात थांबण्यासाठी मदत केली. जे सेवा आचारसंहितेचे उल्लंघन आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करणारे आहे.

मुनीरचे स्पष्टीकरण

घरोटा (जम्मू) येथील रहिवासी मुनीर अहमद २०१७ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाला. त्याची ओळख मीनल खान हिच्याशी सोशल मीडियावर झाली. दोघांनी २४ मे २०२४ रोजी व्हिडिओ कॉलवर निकाह केला. मुनीरने सांगितले की, ३१ डिसेंबर २०२२ रोजी मी लग्नाची इच्छा CRPF ला कळवली होती. मी स्वतःसह, पालक, स्थानिक सरपंच व जिल्हा परिषद सदस्यांचे शपथपत्रे सादर केली होती. त्यानंतर ३० एप्रिल २०२४ रोजी मला परवानगी मिळाली.

मीनल वाघा-अटारी सीमेवरून भारतात

मीनल खान २८ फेब्रुवारी रोजी वाघा-अटारी सीमेवरून भारतात आली होती. तिचा व्हिसा २२ मार्च रोजी संपला. मात्र, मार्चमध्ये तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज व औपचारिकता पूर्ण केल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने तिच्या निर्वासनावर तात्पुरती स्थगिती दिली. दरम्यान, मुनीर बडतर्फीला न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मी कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. नियमांचे पालन केले आहे. माझ्या अधिकारांसाठी मी लढणार आहे, असे त्याने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news