Crime News: सोनं चोरण्याची भन्नाट युक्ती! शेजारील महिलेला उलटी झाली... अन् गळ्यातील दागिने गायब!

सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या एका आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Crime News

लखनौ : प्रवासादरम्यान अचानक उलटी झाल्याचा बहाणा करून, सहप्रवाशांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या एका आंतरराज्यीय टोळीचा लखनौ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरीची एक भन्नाट आणि धक्कादायक शक्कल पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी या टोळीतील सहा महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. (Crime News)

Crime News
Crime News: १५ वर्षांच्या मुलाने आधी भावाला मारले, नंतर गर्भवती वहिनीवर बलात्कार करून केली हत्या; पोलिसही हादरले

अशी होती सोन्याचे दागिने चोरी करण्याची पद्धत

डीसीपी शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अत्यंत पद्धतशीरपणे काम करत असे. टोळीतील एक महिला टार्गेट केलेल्या प्रवाशाला बोलण्यात गुंतवून ठेवत असे. दुसरी महिला अचानक मळमळ होत असल्याचे नाटक करत असे आणि सोबत आणलेल्या दुप्पटा किंवा पॉलिथिन बॅगमध्ये उलटी करण्याचे नाटक करत असे. या किळसवाण्या प्रकारामुळे आणि गोंधळामुळे जेव्हा इतर प्रवासी दुसरीकडे वळत असत किंवा मदतीसाठी पुढे येत असत, तेव्हा तिसरी महिला पीडितेच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मंगळसूत्र किंवा लॉकेट चपळाईने हिसकावत असे. चोरीचा माल लगेचच दुसऱ्या साथीदाराकडे सोपवून आजारी असल्याचा बहाणा करत, टोळीतील सर्व महिला पुढच्या स्टॉपवर घाईघाईने उतरून पसार होत असत. चोरी झाल्याचे पीडितेला समजण्यापूर्वीच त्या गायब झालेल्या असायच्या.

Crime News
Viral News: प्रेमाची शिक्षा: प्रेयसीला भेटायला गेला आणि घरातल्यांना सापडला; नग्न करून गरम तव्यावर बसवलं अन्...

CCTVने टोळीचा पर्दाफाश

२७ ऑक्टोबर आणि त्यानंतर दोन दिवसांनी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनंतर पीडित महिलांनी गोमतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कथौता क्रॉसिंग आणि विराट क्रॉसिंग परिसरात झालेल्या या घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी विराट क्रॉसिंगजवळ सापळा रचून या सहा महिलांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

लखनऊ, मऊ आणि चंदौली येथे अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा संशय आहे की ही टोळी संपूर्ण उत्तर प्रदेशात कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news