

Crime News :
जवळपास तीन दिवसांपूर्वी एक भयानक खून आणि चोरीचा प्रकार घडला होता. यात महिलेला आधी प्रेशर कुकरनं मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिचा चाकू आणि कात्रीनं निर्दयीपणे गळा चिरण्यात आला. हा खून इतका थंड डोक्यानं करण्यात आला होता की महिलेला मारून झाल्यावर दागिने घेऊन पसार होण्यापूर्वी चोरट्यांनी चक्क अंघोळ केली होती. मात्र त्यानंतर या गुन्हेगारांनी मोठी चूक केली. पोलिसांच्या हाती सबळ पुरावा मिळाला अन् ते या निर्दयी खून्यांपर्यंत पोहचले....
ही थरकाप उडवणारी घटना हैदराबादमधील सायबराबाद इथं घडली... त्यांच झालं अस की, सायबराबाद इथं आयटी कंपनीत काम करणारे अग्रवाल हे आपल्या पत्नीला ऑफिसमधून कॉल करत होते. त्यांचा मुलगा देखील आपल्या आईला कॉल करत होता. मात्र ५० वर्षांच्या रेणू अग्रवाल या दोघांच्या कॉलला उत्तर देत नव्हत्या. यामुळं हे पिता पुत्र लवकरच घराकडे परतले. ते घराच्या दारात पोहचला त्यावेळी दार लॉक होतं. ते प्लम्बरच्या मदतीने बाल्कनीमधून घरात शिरले तोच त्यांना रेणू अग्रवाल यांचा मृतदेह समोर दिसला. त्याला मोठा धक्काच बसला.
यानंतर एखच गोंधळ उडाला... पोलीस देखील घटनास्थळी आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणू यांचे हात पाय बांधलेले होते. त्यांना प्रेशर कुकरनं मारहाण झाली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा चाकू आणि कात्रीनं गळा चिरला होता. हे सर्व झालं होतं ते १ लाख रूपये किंमतीच्या ४० ग्रॅम सोन्यासाठी!
विशेष म्हणजे चोरट्यांनी रेणू यांना संपवून ते एक लाख रूपयाचं सोनं घेऊन पसार होण्यापूर्वी त्यांच्याच घरात अंघोळ केली होती. जुने अंगावरचे कपडे काढून तिथंच टाकले होते.
याबाबत तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात यातमध्ये झारखंडचं कनेक्शन आहे. दोन घरकाम करणाऱ्या पुरूषांवर संशय आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हे दोघे जिथं रेणू अग्रवाल यांचा फ्लॅट आहे त्या १३ व्या मजल्यावर जाताना दिसलेत. त्यानंतर ते तिथून सायंकाळी ५ वाजून २ मिनिटांनी बाहेर पडले. या दोघांपैकी एकजण अग्रवाल यांच्या इथं कामाला होता. तो मुळचा झारखंडचा आहे. त्याला अग्रवाल यांनी मॅनपॉवर एजन्सीद्वारे १० दिवसांपूर्वीच कामावर ठेवलं होतं. तर दुसरा आरोपी हा अग्रवाल यांच्या शेजारच्या घरात काम करत होता.