

भारतीय खेळाडूंसाठी दक्षिण रेल्वे विभागात क्रीडापटूंसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्ष 2025-26 साठी विभागांतर्गत विविध खेळातील खेळाडूंसाठी एकूण 67 जागांसाठी भरती करण्यात येते आहे. यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
भारतीय नागरिक असलेल्या विविध खेळातील क्रीडापटूंना या पदांसाठी आजपासून (दि.13) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. दक्षिण रेल्वेत भारतीय खेळाडूंना विविध 67 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोंबर रात्री 23.59 वाजेपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी http://www.rrcmas.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्तर (Level) 4/5
एकूण जागा- 5: अॅथलेटीक्स महिला (1), बॉक्सिंग महिला (1), क्रिकेट पुरूष (1), टेनिस पुरूष (2).
स्तर (Level) 2/3
एकूण जागा- 16: अॅथलेटीक्स पुरूष (2), अॅथलेटीक्स महिला (2), बास्केटबॉल पुरूष (1), बास्केटबॉल महिला (4), बॉक्सिंग पुरूष (1), क्रिकेट पुरूष (2), क्रिकेट महिला (1), गोल्फ (1), स्विमिंग पुरूष (1), टेनिस पुरूष (1)
स्तर (Level) 1
एकूण जागा- 46: अॅथलेटीक्स पुरूष (5), अॅथलेटीक्स महिला (5), बास्केटबॉल पुरूष (3), बॉक्सिंग पुरूष (4), बॉक्सिंग महिला (5), क्रिकेट पुरूष (3), क्रिकेट महिला (1), फुटबॉल पुरूष (5), गोल्फ पुरूष (1), हॉकी पुरूष (6), स्विमिंग पुरूष (2), वेटलिफ्टींग पुरूष (2), वेटलिफ्टींग महिला (4)
Level 1 (7 वा वेतन आयोग पे मॅट्रिक्स): 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय (ITI) किंवा समकक्ष, किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) (NCVT कडून प्रदान केलेले).
Level 2/3 (7 वा वेतन आयोग पे मॅट्रिक्स): 12 वी (+2 स्टेज) उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा, किंवा मॅट्रिक्युलेशन (10 वी) उत्तीर्ण + अप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण, किंवा मॅट्रिक्युलेशन (10 वी) + आयटीआय (NCVT/SCVT मान्यताप्राप्त).
Level 4/5 (7 वा वेतन आयोग पे मॅट्रिक्स): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation).
आवश्यक नाही.
उमेदवाराचे वय 01-01-2026 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. (उमेदवारांचा जन्म 02-01-2001 ते 01-01-2008 दरम्यान झालेला असावा, दोन्ही दिनांक धरून).
कोणत्याही वर्गासाठी वयोमर्यादेत शिथिलता (Relaxation) नाही.
उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्रीडा पात्रतेनुसार आवश्यक क्रीडा कामगिरी (Sports Achievements) असणे बंधनकारक.
01-04-2023 किंवा त्यानंतरची क्रीडा कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
उमेदवार आपापल्या क्रीडा प्रकारात सक्रिय (Active Player) असणे आवश्यक.
सर्वसाधारण उमेदवार महिला, पुरूष उमेदवार : 500 रुपये
SC/ST/महिला/माजी सैनिक/दिव्यांग/अल्पसंख्याक समाजातील उमेदवार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी: 250 रुपये
Level (स्तर) -1: रु. 18,000/-
Level (स्तर) - 2: रु. 19,900/-
Level (स्तर) - 3: रु. 21,700/-
Level (स्तर) - 4: रु. 25,500/-
Level (स्तर) - 5: रु. 29,200/-