Dog in Parliament: हे काय सुरु आहे? संसदेत कुत्रा घेऊन पोहोचल्या काँग्रेस खासदार; परिसरात खळबळ, VIDEO व्हायरल

Congress MP Dog in Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या खासदार रेनुका चौधरी आपल्या पाळीव कुत्र्यासह संसद परिसरात दाखल झाल्या आणि मोठी खळबळ उडाली. सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
Congress MP Dog in Parliament
Congress MP Dog in ParliamentPudhari
Published on
Updated on

Congress MP brings pet dog inside parliament video viral: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक विचित्र घटना घडली आहे. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी या आपल्या पाळीव कुत्र्यासह संसद परिसरात पोहोचल्या होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संसद परिसरात सुरक्षा आणि आचारसंहितेचे अतिशय कडक नियम लागू असतात. पाळीव प्राणी आत घेऊन जाण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत चौधरींच्या या कृतीने सुरक्षा कर्मचारी, उपस्थित खासदार आणि नेटकऱ्यांना धक्का बसला.

घटनेनंतर माध्यमांनी विचारले असता चौधरी यांनी सहज प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या “इतका छोटासा जीव आहे. कोणालाही इजा करणार नाही. जर सरकारला हरकत असेल तर यालाही पास देऊन टाका!” त्यांची प्रतिक्रिया पाहताच त्यांच्या समर्थकांमध्ये हशा पिकला, पण विरोधकांनी तत्काळ नाराजी व्यक्त केली.

Congress MP Dog in Parliament
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की विराट कोहली? सुनील गावस्कर यांनी सांगितलं वनडे क्रिकेटचा खरा किंग कोण?

भाजपने केला विरोध

भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी या घटनेवर कडक शब्दांत टीका केली. त्यांच्या मते “खासदारांना विशेषाधिकार मिळाले म्हणून संसदेत पाळीव प्राणी घेऊन जाण्याचा अधिकार नाही. नियम मोडल्यास कारवाई व्हायलाच हवी.” यामुळे हा मुद्दा आणखी तापला आणि काही मिनिटांत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हिवाळी अधिवेशनाची सुरुवात महत्वाची विधेयकं मांडणार

या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाला औपचारिक सुरुवात झाली आहे.
या सत्रात 15 बैठका होणार असून सरकार अनेक महत्त्वाची विधेयकं सादर करणार आहे. त्यामध्ये—

  • Atomic Energy Bill

  • Higher Education Commission of India Bill

  • Corporate Laws Amendment Bill

  • Insurance Laws Amendment Bill

  • National Highways Amendment Bill

वित्तमंत्री निर्मला सीतारामन उत्पादन शुल्क आणि सेसशी संबंधित प्रस्ताव मांडणार आहेत.

Congress MP Dog in Parliament
Ajit Pawar: 'थांब, थांब…' कार्यकर्त्याने ‘मुख्यमंत्री’ म्हटल्यावर अजित पवारांचा विनोदी इशारा; पुण्यातील सभेत नेमकं काय घडलं?

महागाई, दिल्ली ब्लास्ट, प्रदूषण, परराष्ट्र धोरणावर प्रश्न विचारणार

विरोधक या सत्रात महागाईपासून ते दिल्लीतील अलीकडील ब्लास्टपर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरणार आहे. त्याशिवाय वाढत्या हवा प्रदूषणावर, तसेच परराष्ट्र धोरणातील अपयशावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news