CM Joseph Vijay Bus Conductor: मुख्यमंत्री विजय झाले कंडक्टर... महिला, ट्रसजेंडरसाठी स्वतः फाडली 'फ्री' तिकीटे

मुख्यमंत्री विजय यांना विद्यार्थिनींने मोफत तिकीट दिल्याबद्दल चॉकलेट देखील दिले. ते विजय यांनी आपल्या खिशात ठेवले.
CM Joseph Vijay Bus Conductor
CM Joseph Vijay Bus Conductorpudhari
Published on: 
Updated on: 

CM Joseph Vijay Bus Conductor: तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी शुक्रवारी राज्यभरातील महिलांना आणि ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तींना मोफत बस तिकीट देण्याच्या योजनेचे उद्घाटन केलं. त्यांनी वेट्री पयनम तोट्टम योजनेच्या नव्या टप्प्याचा शुभारंभ केला. याअंतर्गत आता इतर श्रेणीतील बसमध्ये देखील मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

गांधी जयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने ही योजना सुरू केली आहे. यावेळी खुद्द मुख्यमंत्री विजय चेन्नईत बसमधून प्रवास करताना दिसले. यावेळी त्यांनी स्वतः मोफत तिकीटे वाटली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या कॉलेजच्या मुलींने मुख्यमंत्र्यांना चॉकलेट देखील दिले.

CM Joseph Vijay Bus Conductor
Tamilnadu CM Joseph Vijay |'अभिनेत्याचा पक्ष' म्हणून हिणवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर, विजय यांचा 'सिनेमॅटिक' व्हिडिओ व्हायरल

एक्सप्रेस, डिलक्सपर्यंत योजनेचा विस्तार

दररोज या मोफत बस प्रवासाचा लाभ हा ८४.३२ लाख महिलांना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. लाभार्थी राज्य परिवहन मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या १२ हजार ६९५ बसमध्ये मोफत प्रवास करू शकणार आहेत. यात एक्सप्रेस आणि डिलक्स श्रेणीतील सेवा देखील सामील करण्यात आल्या आहेत. यापूर्वी मोफत प्रवासाची सुविधा ही काही श्रेणींपुरतीच मर्यादित होती. मात्र आता ही सुविधा एक्सप्रेस आणि डीलक्स आणि काही निवडक डोंगराळ भागासाठी देखील सुरू करण्यात आली आहे.

CM Joseph Vijay Bus Conductor
Tamil Nadu CM Joseph Vijay : महिला सुरक्षा 'सर्वोच्‍च' ! तामिळनाडूमध्ये CM जोसेफ विजय यांनी लाँच केले 'ऑल विमेन पोलीस युनिट'

एका दिवसात किती प्रवास?

तमिळनाडू राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही उत्पन्नाची अट टाकलेली नाही. किंवा एका दिवसात कितीवेळा मोफत प्रवास करता येईल अशी देखील अट टाकलेली नाही. त्यामुळं दिवसातून तुम्ही कितीहीवेळा मोफत प्रवास करू शकता. या योजनेचे नाव वेट्री पयनम हे सत्ताधारी पक्ष तमिलगा वेट्री कषगम (TVK) पासून प्रेरित असून याचा अर्थ विजयी यात्रा असा होतो.

CM Joseph Vijay Bus Conductor
Joseph Vijay TN Government Political crisis: विजय यांचे सरकार धोक्यात; कट्टर विरोधक AIADMK, DMK एकत्र येऊन मोठा गेम करणार?

प्रवासाचा खर्चाची प्रगतीत अडचण नको

राज्याचे परिवहन मंत्री ए विजय तमिलन पार्थिबन यांनी सांगितलं की महिला, ट्रान्सजेंडर्सना शिक्षण, रोजगार, उपजीविका आणि आर्थिक सशक्तीकरणामध्ये प्रवासाला येणारा खर्च ही बाधा ठरू नये हा या योजनेचा मुख्य उद्येश आहे. हे पाऊल समानता वाढवण्यासाठी उचलण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news