Joseph Vijay TN Government Political crisis: विजय यांचे सरकार धोक्यात; कट्टर विरोधक AIADMK, DMK एकत्र येऊन मोठा गेम करणार?

Joseph Vijay TN Government Political crisis
Joseph Vijay TN Government Political crisispudhari
Published on
Updated on

Vijay Tamil Nadu Government Crisis: तमिळ नाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याविरूद्ध राज्यातील सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. एआयएडीएमकेने डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी एकत्र येण्याची साद घातली आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षाविरूद्ध सर्व विरोधक एकत्र येण्याची देखील शक्यता आहे. याबाबत अजून डीएमकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

मंगळवारी माजी मुख्यमंत्री एडापड्डी के पलनीस्वामी यांना टीव्हीकेविरूद्ध आघाडी करण्यासाठी तुम्ही तयार आहे की नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही देखील टीव्हीकेविरोधक आहोत. जर दुसरा पक्ष आमच्यासोबत येऊ इच्छितो तर आम्ही त्यांचे स्वागत करू. आमची आघाडी आहे तशीच राहणार आहे. जर दुसरा कोणता पक्ष त्यात येणार असेल तर तो सामील होऊ शकतो.

Joseph Vijay TN Government Political crisis
Tamil Nadu CM Joseph Vijay : महिला सुरक्षा 'सर्वोच्‍च' ! तामिळनाडूमध्ये CM जोसेफ विजय यांनी लाँच केले 'ऑल विमेन पोलीस युनिट'

एआयएडीएमकेचे ६ आमदार फुटले

विशेष म्हणजे तमिळनाडू विधानसबा निवडणूक संपल्यानंतर अन्ना द्रमुकचे ६ आमदार फुटले होते. सर्व विजय यांच्यासोबत गेले होते. उरलेल्या आमदारांमध्ये देखील दोन गट पडले असून डीएमके नेता आरएस भारती यांनी जूनमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारली होती. मात्र जर डीएमके आणि एआयएडीएमके भवष्यात एकत्र आले तर त्यात काही गैर देखील असणार नाही.

Joseph Vijay TN Government Political crisis
Tamil Nadu CM Vijay Amma Canteen Revamp | तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी दिले 'अम्मा कॅन्टीन्स'च्या नूतनीकरणाचे आदेश

डीएमकेने दिला होता इशारा

ऑगस्ट महिन्यातच स्टॅलिन यांनी त्यांचा पक्ष राजकीय पुनरागमन करण्यास सक्षम आहे. ते राज्यात पुन्हा एकदा मतदारांचे समर्थन मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. स्टॅलिन यांनी द्रमुक मुख्यालय अन्ना अरिवलयममध्ये पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत संबोधित करताना विजय हे विधानसभेला चित्रपटाचा एक सेट समजतात आणि डायलॉगबाजी करतात अशी टीका केली होती.

स्टॅलिन यांनी, आम्ही राजकारणात यासाठी आलो नाही की आम्हाला काही गोष्टींचा कंटाळा आला होता. आम्ही इथं लढण्यासाठी आलो होतो. आमचा आंदोलनाचे आयुष्य फक्त यश आणि अपयश याच्यापुरतं अवलंबून नाहीये. निवडणूक हरल्यानतंर दुसऱ्या निवडणुकीपर्यंत झोपा काढणे हे दुसऱ्या पक्षांची सवय असेल. विरोधात बसून आमची पक्ष सुस्ती न बाळगता जोमान काम करण्यासाठी कटीबद्ध आहे. आमचे विरोधक ही गोष्ट जाणतात.'

Joseph Vijay TN Government Political crisis
Tamil Nadu government formation: तमिळनाडूत राज्यपाल विजय यांची अडवणूक करत आहेत... २०१९ ला महाराष्ट्रात झालं तसं आता का नाही?

टीव्हीकेची बैठक, डावे मात्र दूर

टीव्हीकेने बुधावारी चेन्नईत आपल्या सहकारी पक्षांसोबत दुसरी समन्वय बैठक बोलवली आहे. मात्र या बैठकीत सामील होण्यास मार्क्सवादी कम्युनिटस्ट पक्ष आणि भाकपाने नकार दिला आहे. टीव्हीकेने आघाडीला औपचारिक स्वरूप देणं, कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करणे, समन्वय समिती स्थापित करणे आणि आघाडीला औपचारिक नाव देणे या उद्येशासाठी ही बैठक बोलवली आहे. या बैठकीत काँग्रेस, वीसीके, आययूएमएल आणि एमडीएमके सामील होण्याची शक्यता आहे. मात्र डाव्या पक्षांनी मात्र यापासून अंतर राखलं आहे.

Joseph Vijay TN Government Political crisis
Tamil Nadu CM Vijay: शपथ घेतानाच विजय यांनी केली मोठी चूक; राज्यपाल ओरडले, नेमकं काय झालं?

काँग्रेस टीव्हीकेतही मतभेद

नुकेतच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय यांना पंतप्रधान पदाचा संभावित चेहरा बनवण्यात यावे अशी मागणी टीव्हीकेने केली होती. त्यावरून काँग्रेससोबत ओढाताण झाली होती. काँग्रेसने विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना इंडिया ब्लॉकचा प्रमुख चेहरा आहे असं सांगितलं आहे. टीव्हीकेने विजय फॉर पीएम ही मागणी वैयक्तिक असल्याचं सांगत सारवासारव केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news