Land Records Using Claude Cowork: क्लाऊड कोवर्क वापरून तुमच्या नावावर कुठं जमीन आहे हे कसं शोधायचं? जाणून घ्या प्रोसेस

Land Records Using Claude Cowork:
Land Records Using Claude Cowork:pudhari
Published on
Updated on

How to find land records using Claude Cowork 2026: मूळचा उत्तर प्रदेशातील मात्र सध्या कामानिमित्त बंगळुरूमध्ये असलेल्या झाकीर खान यांची लिंक्ड इन वरील एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये क्लाऊड कोवर्कच्या मदतीनं वडिलोपार्जित जमीन कुठं आहे कसं शोधून काढलं याची माहिती दिली.

Land Records Using Claude Cowork:
Agentic AI Revolution | ‘एजेंटिक एआय’ची नवक्रांती

झाकीर खान आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'वडिलोपार्जित जमिनीच्या बाबतीत तर आपल्या पिढीची अवस्था फार बिकट आहे. माझे आजोबा, त्यांचे वडील आणि शेवटी माझे दिवंगत वडील... यांच्याकडून वारसाहक्काने मिळालेली जमीन उत्तर प्रदेशातल्या एका छोट्या 'मोहम्मदपूर' नावाच्या गावात आहे. मी माझ्या आयुष्यात तिथे फक्त दोन-चार वेळा गेलोय. आता मला जर कोणी अचानक विचारलं की, 'जा रे झाकीर, आपली जमीन कुठे आहे बघून ये,' तर मी गावातल्या पारावर बसून लोकांचे पत्ते विचारत बसण्यापलिकडे काहीच करू शकणार नव्हतो.

आजकाल सगळीकडे डिजिटल रेकॉर्ड्स झालेत म्हणतात. मी पण ऑनलाईन शोधायचा प्रयत्न केला. पण सरकारी वेबसाईटवरची ती शुद्ध, कायदेशीर आणि क्लिष्ट भाषा! ती भाषा वाचताना वाटतं की आपण सातबारा बघत नाहीयेत, तर एखादा प्राचीन ग्रंथ वाचतोय. सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाणारी ती शब्दरचना!

Land Records Using Claude Cowork:
Ajanta Caves : अजिंठा लेणीत डिजिटल गाईड टूर क्यूआर कोड

क्लाऊड कोवर्कचा जुगाड

मग मी एक जुगाड केला... हल्ली ज्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे, त्या 'क्लाऊड कोवर्क' (Claude Cowork) या AI चा वापर केला. त्याच्या 'काँप्युटर युज' या फिचरने जे काम केलं, ते पाहून मी थक्क झालो. कोणत्याही वकिलाशिवाय किंवा तलाठ्याशिवाय माझ्या वडिलांच्या नावावर असणारे तब्बल २५ प्लॉट या AI ने शोधून थेट माझ्या गुगल मॅपवर आणून ठेवले!

आता मला फक्त गाडीचे स्टेअरिंग फिरवायचे आहे, गुगल मॅप लावायचा आहे आणि थेट माझ्या जमिनीच्या बांधावर जाऊन उभं राहायचं आहे. तंत्रज्ञान जेव्हा तुमच्या मातीशी जोडलं जातं, तेव्हा खरी मजा येते!"

Land Records Using Claude Cowork:
ChatGPT Murder Case |पुरुषांसोबत डेटवर जायची, नंतर चॅटजीपीटीला विचारून गोळ्या द्यायची... दोघांच्या मृत्यूने खळबळ

जर तुम्हालाही तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचा अचूक शोध घ्यायचा असेल, तर 'क्लाऊड कोवर्क' (Claude Cowork - Computer Use) चा वापर करून खालील ५ सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही गुगल मॅपवर तुमची जमीन शोधू शकता:

स्टेप १: सरकारी डिजिटल रेकॉर्ड सर्च (Land Records Search)

सर्वप्रथम क्लाऊड एआय तुमच्या राज्याच्या अधिकृत भूमी अभिलेख (उदा. भुलेख किंवा महाभूलेख) वेबसाईटवर जाते. तिथे एआय ऑन-स्क्रीन कीबोर्डचा वापर करून तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांचे नाव क्लिष्ट हिंदी/मराठी भाषेत टाईप करते. या सर्चमधून त्या व्यक्तीच्या नावावर असणारे सर्व 'गाटा संख्या' (Gata Sankhya) किंवा सर्व्हे नंबर आणि प्लॉटची यादी एआय शोधून काढते.

स्टेप २: सरकारी नकाशावरून भूमिती काढणे (Plot Geometry Extraction)

यानंतर एआय सरकारी भू-नकाशा (Bhu-Naksha) वेबसाईटवर जाते. तिथे मिळालेले सर्व्हे नंबर टाकून तुमच्या जमिनीच्या तुकड्यांचा अचूक आकार (Rough Plot Geometries) आणि सीमा रेषा स्क्रीनवर खेचून आणते.

Land Records Using Claude Cowork:
AI Chatbot Tragedy | धक्‍कादायक..! 'एआय' चॅटबॉटला मानले पत्नी; भावनिक गुंतागुंतीतून तरुणाने जीवन संपवले!

स्टेप ३: युटीएम (UTM) चे लॅटिट्युड-लॉन्जिट्युडमध्ये रूपांतर

सरकारी नकाशावरील Coordinates हे सहसा 'UTM' फॉरमॅटमध्ये असतात, जे सामान्य गुगल मॅपवर चालत नाहीत. क्लाऊड एआय स्वतःहून एक कोडिंग टूल तयार करते. त्या टूलच्या मदतीने जमिनीच्या सर्व कोपऱ्यांवर (Vertices) क्लिक करून त्या UTM कोड्सचे गुगल मॅपला समजणाऱ्या 'लॅटिट्युड आणि लॉन्जिट्युड' (Lat/Long) मध्ये रूपांतर (Convert) करते.

स्टेप ४: केएमएल (KML) फाईल तयार करणे

सर्व २५ किंवा त्याहून अधिक प्लॉट्सचे अचूक भौगोलिक नकाशे मिळाल्यानंतर, एआय या सर्व डेटाची एकत्र मिळून एक .KML (Keyhole Markup Language) फाईल तयार करते. ही फाईल म्हणजे तुमच्या जमिनीचा डिजिटल नकाशा असतो.

Land Records Using Claude Cowork:
Film Screenwriters | भारतातील 74% पटकथा लेखकांना मिळतंय कमी मानधन, 41% जणांनी दिली AI चा वापर केल्याची कबुली!

स्टेप ५: गुगल मॅपवर थेट नेव्हिगेशन (Google My Maps Upload)

शेवटी, क्लाऊड एआय ही तयार झालेली KML फाईल तुमच्या 'Google My Maps' वर अपलोड करते. यामुळे तुमच्या गुगल मॅपवर तुमच्या जमिनीच्या चौकटी (Polygons) अचूकपणे दिसू लागतात. आता तुम्ही मोबाईलवर गुगल मॅपचे नेव्हिगेशन ऑन करून थेट तुमच्या जमिनीपर्यंत गाडी चालवत जाऊ शकता!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news