Dharmendra Pradhan Resignation: 'जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर...,' CJPचा प्लॅन बी काय आहे? आशुतोष रांकांनी स्पष्टच सांगितलं

Dharmendra Pradhan Resignation: केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर CJP ने नुकसानभरपाई आणि कायदेशीर मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.
Dharmendra Pradhan Resignation
Dharmendra Pradhan ResignationPudhari
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Resignation: केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आपल्या प्रमुख मागणीवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे हीच पक्षाची सर्वात महत्त्वाची मागणी आहे. या मुद्द्यावर सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नुकसानभरपाई आणि कायदेशीर मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा

आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारसोबत झालेल्या बैठकीत नुकसानभरपाई आणि कायदेशीर बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. या मुद्द्यांवर सरकारने अनुकूल भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले असून लवकरच यासंदर्भात लेखी सहमती मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली. मात्र, आंदोलनाची मुख्य मागणी असलेल्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य मागणीवर निर्णय होत नसेल, तर बैठकीला अर्थ नाही

रांका म्हणाले की, जर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर अशा बैठकींना काहीच अर्थ उरणार नाही. अशा परिस्थितीत संघटना पुढील आंदोलनाची रणनीती ठरवेल आणि आवश्यक असल्यास अधिक कठोर भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Dharmendra Pradhan Resignation
E20 Petrol Protest: E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी चालकांचा एल्गार; संसदेवर मोर्चाची घोषणा, सरकारकडे मोठ्या मागण्या

NTA अधिकाऱ्यांच्या बदलीवर प्रतिक्रिया

सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मधील 47 अधिकाऱ्यांना हटवण्याच्या निर्णयावरही आशुतोष रांका यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, या निर्णयाचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. मात्र, केवळ अधिकाऱ्यांची बदली किंवा कारवाई करून मूळ प्रश्न सुटत नाही, असे त्यांनी म्हटले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, NEET पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कथित आत्महत्यांच्या घटनांची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची असून, त्याची जबाबदारी शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे.

Dharmendra Pradhan Resignation
NEET Paper Leak: निर्मला सीतारामन यांनी सांगितले पेपर फुटीचे फायदे? विरोधक आक्रमक; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणांचीही मागणी

रांका यांनी स्पष्ट केले की, CJP केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही, तर देशातील परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याचीही मागणी करत आहे.

सरकारकडे मागण्यांचे निवेदन

सरकारसोबतच्या बैठकीदरम्यान CJP ने आपल्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सरकारकडे सादर केले आहे. आता सरकार पुढे कोणती भूमिका घेते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे रांका यांनी सांगितले.

त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सरकारने त्यांच्या मुख्य मागण्यांवर समाधानकारक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पर्याय संघटनेकडे खुला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news