CJP Delhi Protest: CJP ने विरोधकांच्या सुप्रीम मार्चला दिला पाठिंबा; इंडिया गेटपासून करणार कूच

राहुल गांधी यांनी सरकारचे २०० अधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
CJP Delhi Protest
CJP Delhi Protestpudhari
Published on: 
Updated on: 

CJP Delhi Protest: कॉकरोच जनता पार्टीचे नेते आणि सह समन्वयक सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी आज (सोमवार) जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मागण्यासाठी संसद मार्ग पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीच्या नेत्यांनी दिल्ली पोलिसांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीने विरोधी आघाडीच्या सुप्रीम मार्चला पाठिंबा दिला. हा मोर्चा इंडिया गेटपासून पुढे कूच कराणार आहे.

CJP Delhi Protest
CJP Delhi Protest : अखेर गृह मंत्रालय नरमले, दिल्‍लीत आंदोलन परवानगी;मात्र जंतर मंतरवरील 'नो एन्‍ट्री' कायम

CJI ने भेटण्यास दिला नकार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात पोहून इतर पक्षांच्या साथीदारांसोबत CJI सूर्यकांत यांना निवेदन देणार आहोत. यासाठी मुल्लिकार्जुन खरगे यांनी सीजेआय यांच्यासाठी एक पत्र देखील पाठवलं होतं. मात्र सीजेआय सूर्यकांत यांनी भेटण्यास नकार दिला. त्यांनी मी कोणत्याही खास पक्षाला भेटू शकत नाही. यापूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना भेटून त्यांना निवेदन दिलं होतं.

CJP Delhi Protest
CJP Delhi protest: गेल्या ७२ तासांत 'हुकूमशाह' मोदींनी आणीबाणीच्या काळातील घटनांनाही मागे टाकले; सीजेपीचा हल्लाबोल

किती वाजता होणार कूच

काँग्रेसने सांगितलं की विरोधी पक्षांचा सुप्रीम कोर्टवरील मार्च हा दुपारी १.३० वाजता इंडिया गेटपासून सुरू होणार आहे. यापूर्वी पत्रकार परिषदे घेऊन राहुल गांधी यांनी फक्त ५ दिवसांपासून त्यांना रोखलं जात नसून हे अनेक वर्षापासून सुरू होत आहे.

CJP Delhi Protest
CJP Delhi protest : दिल्लीत 'सीजेपी'चे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; १०० हून अधिक जणांना घेतले ताब्यात

राहुल गांधी यांनी सरकारचे २०० अधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ते मला सतत माहिती देत आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. पाच गुन्हेगारांनी देशाच्या आत्म्यावरच हल्ला केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news