Saurav Das Modeling: CJP च्या सौरभ दासचा मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट? ९ वर्षे जुने ट्विट आता का होत आहे व्हायरल?

सौरभ दास कधी काळी मॉडेल होण्याची स्वप्ने पाहत होता. ९ वर्षापूर्वीचे त्याचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Saurav Das Modeling
Saurav Das Modelingpudhari
Published on: 
Updated on: 

Saurav Das Modeling Old Tweet: कॉकरोच जनता पार्टीचे सह संयोजक सौरभ दास हा कॉकरोच पार्टी या प्रेशर ग्रुपमध्ये सामील होण्यापूर्वी एक लीगल रिपोर्टर म्हणून काम करत होता. पत्रकार म्हणून काम केलेल्या सौरभ दास कधी काळी मॉडेल होण्याची स्वप्ने पाहत होता. ९ वर्षापूर्वीचे त्याचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या ट्विटमध्ये तो ई-कॉमर्स कंपन्यांना संपर्क करून त्यांच्या प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करण्याबाबत कसा संपर्क केला जाऊ शकतो याची माहिती घेत आहे. यावरून आता सौरभ दास हा ट्रोल देखील होत आहे.

Saurav Das Modeling
Saurav Das On Judiciary: जामीनावर बाहेर असलेल्या सौरभ दासचं मोठं धाडस... अनेक न्यायाधीशांनी देशाला धोका दिल्याचा केला आरोप

सज्ञान होताच रोजगाराच्या शोधात

सौरभ दासने २०१७ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी कामाच्या शोधात होता. सौरभ दासला वाटत होतं की तो मॉडेल म्हणून काम करू शकतो. त्यासाठी त्यांनी काही ई-कॉमर्स कंपन्यांशी संपर्क केला होता. सोशल मीडियावर सौरभच्या या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.

सीजेपी नेता दासने २२ मे २०१७ रोजी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी ऑनलाईन ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि त्याच्या कस्टमर केअरला टॅग करून, मी तुमच्या प्रोडक्ट्ससाठी मॉडेल म्हणून काम करू शकतो. कृपया मला मदत करा, धन्यवाद असे ट्विट केले होते. त्याच रात्री स्नॅपडीलसह इतर कंपन्यांना देखील सौरभने मेसेज केले होते.

Saurav Das Modeling
Saurav Das Ashutosh Ranka : एसआयआरविरोधी आंदोलन सुरूच राहणार, ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल!

आता सुरू झालं ट्रोलिंग

सौरभ दास याला यावरून ट्रोलिंग सुरू झालं आहे. मात्र सौरभ दासकडून रोजगाराचा शोध घेणे ही काही वाईट गोष्ट नाही. मॉडेलिंग हे काही खराब क्षेत्र नाही. सौरभ दास याच्या ९ वर्षापूर्वीच्या ट्विटवरून आता काही लोक विनोद करणे आणि त्याची टर उडवणे हे उद्योग सुरू करत आहेत. सौरभ दासने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Saurav Das Modeling
CJP protest : सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी सुरूच, दिल्ली पोलिसांचे समन्स

लीगल रिपोर्टिंगनंतर दुसरे क्षेत्र

सौरभ दास दीर्घ काळासाठी फ्रीलान्सिंग लीगल रिपोर्टिंग करत होता. त्याने प्रतिष्ठित मासिकांसाठी लेख लिहिले आहेत. तो सर्वोच्च न्यायालयातील आणि उच्च न्यायालयातील जज आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लिहित होता.

दरम्यान, त्याचा जुना मित्र अभिजीत दिपकेने सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हे पेज तयार केलं अन् त्याचे तुफान फॉलोअर्स निर्माण झाले. त्यानंतर सौरभ दासच्या कारकिर्दीला देखील कलाटणी मिळाली. आता तो एक राजकीय दबाव गटाचा प्रमुख चेहरा म्हणून काम करत आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news