

CJP Protest Viral Video: दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोज जनता पार्टी गेल्या महिन्याभरापासून नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करत आहे. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी केली. यासाठी २० जुलै रोजी संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (RAF) जवानांनी आंकोलकांवर खूप लाठीहल्ला केला. तसेच पॅलेट गन आणि अश्रू धुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.
या लाठीर्चाज आणि पॅलेट गनच्या वापरावरून दिल्ली पोलीस आणि RAF च्या जवानांवर तुफान टीका होत आहे. विरोधी पक्षाने याला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडं रस्त्यावर एवढा मार खाऊन देखील जेन झीने या पोलीस आणि आरएएफ जवानांबाबत सहिष्णुता आणि माणुसकी दाखवली आहे.
दिल्ली आंदोलन जेन झींच्या चिवट वृत्तीसाठी आणि त्यांच्या हटके पोस्टरबाजीसाठी चांगलंच गाजत आहे. कोणी नववधुच्या वेषात येऊन चर्चेत येत आहे तर काही जण आकर्षक पोस्टर हातात घेऊन आपला मुद्दा आणि मागण्या अत्यंत हटके पद्धतीने समोर ठेवत आहेत.
मात्र आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मानवी मुल्ये अजून जिवंत आहेत याचं दर्शन घडवणार आहे. या व्हायरल व्हिडिओत एक आंदोलक पिझ्झाचा बॉक्स घेऊन रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांजवळ पोहचतो आणि ड्युटीवर असलेल्या जवानाला पिझ्झा ऑफर करतो. त्यांना खाण्यासाठी विनंती करतो.
व्हिडिओमध्ये हा तरूण सतत सर प्लीज खाऊन घ्या असं म्हणताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. हा व्हिडिओ नितेश कुमार तिवारीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलं आहे की आम्ही वर्दीचा मान राखतो. मात्र साद्या कपड्यात हल्ला करण्याऱ्यांचे समर्थन करत नाही. पोलिसांना फक्त एक विनंती आहे. लोकांना मारू नका.
या व्हिडिओवर लोकांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी अनेकांचे विचार वेगळे असू शकता. मात्र या सर्वांवर माणुसकी असते. आंदोलन आणि ड्युटी आपापल्या जागी आहे. मात्र भूक ही समान आहे यात राजकारण नसतं.
अनेकांनी अशा छोट्या गोष्टी तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी एक सकारात्मक संदेश देतात. सोशल मीडियावर एक मुलगी जवानांना फूल देत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॉक्रोज जनता पार्टी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन आणि सरकार दोघेही अडून बसले आहेत. याबाबत सीजेपीने आज दुपारपर्यंतचा वेळ दिला आहे. आतापर्यंत सीजेपी आणि केंद्राच्या मंत्र्यांसोबत ३ वेळा चर्चा झाली आहे.