

Supreme Court lawyers detained Delhi : 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) जंतरमंतर येथे पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराजवळ आज वकिलांनी निदर्शने केली. यामध्ये ज्येष्ठ आणि महिला वकिलांनी आपला सहभाग नोंदवला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या काळात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. या कारवाईनंतर 'सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन'ने (SCBA) भारताच्या सरन्यायाधीशांकडे (CJI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली. 'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, त्यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
SCBA चे अध्यक्ष प्रदीप राय यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास 'X' पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना त्यांच्या चेंबरमधून ताब्यात घेतल्याच्या वृत्ताचे वर्णन त्यांनी "अत्यंत चिंताजनक" असे केले. हा विषय तातडीने सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिला जात आहे. वकिलांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेणे आणि त्यांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही. मी वकिलांच्या त्वरित सुटकेची मागणी करतो," असेही राय यांनी पोस्टमध्ये नमूद केले. त्यांनी नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याशीही चर्चा केली आहे. उपायुक्तांनी त्यांना आश्वासन दिले की ताब्यात घेतलेल्या वकिलांची त्वरित सुटका केली जाईल.
'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, त्यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.