Jantar Mantar Protest Case : 'कॉकरोच जनता पार्टी'च्‍या सौरव दास, आशुतोष रंका यांच्‍या न्यायालयीन कोठडी वाढ

जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार
Jantar Mantar protest case
आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत आज आणखी दोन दिवसांची वाढ करण्‍यात आली. File Photo
Published on: 
Updated on: 

Jantar Mantar protest case : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी आज (दि. १९) आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.

तात्काळ सुटकेची वकिलांची विनंती

न्यायालयीन कोठडीतून सुटका व्हावी यासाठी 'सीजेपी'च्या कायदेशीर टीमने विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. अटकेच्या दिवशी जामीनदार उपलब्ध नसल्याने त्यांना सुरुवातीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जामीनदार हजर करण्यात आले असून त्यांच्या तात्काळ सुटकेची विनंती वकिलांनी केली आहे.

Jantar Mantar protest case
Jantar Mantar Protests | ‘जंतर मंतर’वरील आक्रोश इतिहासजमा

जंतरमंतरवरील बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी झाली होती अटक

जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे अधिकृत ठिकाण म्हणून रद्द (Denotified) करण्यात आल्यानंतरच्या दिवशी, म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी दास आणि रांका यांनी तिथे प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना १३ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले आणि १४ ऑक्टोबरला ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.या ठिकाणी आपण केवळ राष्ट्रध्वज फडकावला आणि घोषणाबाजी केली, असा दावा 'सीजेपी'च्या नेत्यांनी केला आहे.

Jantar Mantar protest case
Jantar Mantar Protests | लैंगिक छळाच्या प्रकरणांची सर्वप्रथम चौकशी होणार : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणी सरन्यायाधीशांची स्‍पष्‍टोक्‍ती

मुख्य निवडणूक आयुक्त आणि 'SIR'विरोधात आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news