CJI on Cockroach Janata Party | 'एवढं मनाला लावून घेऊ नका' : 'कॉकरोच जनता पार्टी' याचिकेवर सरन्यायाधीश काय म्हणाले?

CJI on Cockroach Janata Party |तातडीने सुनवणीची मागणी करणार्‍या वकिलांना दिला सल्‍ला
CJI on Cockroach Janata Party
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

CJI on Cockroach Janata Party

नवी दिल्ली : "कॉकरोच जनता पार्टी' ही गोष्‍ट एवढी मनाला लावून घेऊ नका. संबंधित प्रकरणाला इतके भावनिक होण्‍याची गरज नाही, अशी टिप्‍पणी सरन्‍यायाधीश सर्यू कांत यांनी आज (दि. २५) केली . अॅडव्होकेट एन. के. गोस्वामी यांनी या प्रकरणी तातडीने तातडीने सुनावणी घेण्याची तोंडी विनंती केल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपलं मत स्‍पष्‍ट केले.

ॲड. गोस्‍वामी यांची मागणी काय?

एका वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेचा उल्लेख करत अॅड. एन. के. गोस्वामी यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. यानंतरही न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यासाठी एक विकृत आणि द्वेषपूर्ण प्रचार अजूनही सूरुच आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्‍यावी, अशी विनंतीही त्‍यांनी यावेळी केली.

CJI on Cockroach Janata Party
CJI Surya Kant | "नोकरी न मिळाल्याने झुरळांप्रमाणे वागणारे काही तरुण..": याचिकाकर्त्याला सरन्यायाधीशांनी नेमकं काय सुनावले?

प्रकरण एवढे मनाला लावून घेऊ नका

सरन्‍यायाधीश सूर्य कांत यांच्‍यासमोर अॅड. एन. के. गोस्वामी यांनी कॉकरोच जनता पार्टीवरुन सुरु असणार्‍या विपरीत आणि बदनामीकारक प्रचाराचे मत ऐकून घेतले. हे प्रकरण एवढे मनाला लावून घेऊ नका, असे स्‍पष्‍ट करत या प्रकरणी कोणतीही तत्‍काळ सुनावणीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालय याचा योग्य वेळी यावर विचार करेल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

CJI on Cockroach Janata Party
CJI Surya Kant | 'संपूर्ण पुरुष समाजाची मक्तेदारी तुम्हीच घेतली का?'; CJI सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला झापले!

काय आहे 'कॉकरोच जनता पार्टी' प्रकरण?

एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी ऑनलाईन सक्रियतेच्या नावाखाली यंत्रणेवर टीका करणाऱ्या काही बेरोजगार तरुणांची तुलना 'कॉकरोच' (झुरळे) अशी केली होती. यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' ही सोशल मीडियावरील एक उपरोधात्मक मोहीम सुरु झाली. अल्‍पावधीत याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते की, त्यांचा रोख 'बनावट पदव्या' असलेल्या लोकांवर होता. अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे सोशल मीडिया अकाउंट्स नंतर सस्‍पेंड करण्‍यात आले.

CJI on Cockroach Janata Party
CJI Surya Kant: ‘तरुणांना झुरळ म्हटलं नाही’; वादानंतर CJI सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण, माध्यमांवर चुकीच्या रिपोर्टिंगचा आरोप

सीबीआय चौकशीचीही मागणी

दरम्यान, न्यायालयातील तोंडी टिप्पण्यांचा व्यावसायिक किंवा आर्थिक फायद्यासाठी वापर केला जाऊ नये आणि बनावट वकिलांविरुद्ध सीबीआय (CBI) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका दुसऱ्या एका वकिलाने तातडीच्या सुनावणीसाठी सादर केली. ही याचिकाही 'कॉकरोच जनता पार्टी' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आली आहे. तथापि, सरन्यायाधीशांनी या प्रकरणात कोणतीही घाई नसल्याचे स्पष्ट करत, या याचिकेवर नियमानुसार योग्य वेळी सुनावणी घेतली जाईल असे स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news