

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष वेधले आहे. एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहे. आता भारताच्या निवडणुकाकडे चीनचेही लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनच्या सरकारचे मुखपत्र असणार्या ग्लोबल टाइम्सने भारतीय निवडणूक निकालाच्या भाकितावर भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बंपर विजयाच्या अंदाजाने चीनही आनंदीत असल्याचे दिसत आहे. ग्लोबल टाइम्सने आपल्या एका लेखात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील असे म्हटले आहे. ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र आहे. त्यामुळेच हा लेख चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारतीलच शिवाय सीमेवरील संघर्षही कमी होतील. मोदी तिसऱ्यांदा आल्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण अधिक सुधारेल आणि त्याची विश्वासार्हता आणखी वाढेल, असा विश्वासही चीनने व्यक्त केला आहे.
ग्लोबल टाइम्सच्या लेखात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीचाही उल्लेख केला आहे. त्यात पंतप्रधान म्हणाले होते की, भारताचे चीनसोबत चांगले संबंध आहेत, मात्र दोन्ही देशांना सीमेवर सुरू असलेला संघर्ष तातडीने सोडवावा लागेल.
हेही वाचा :