Chhattisgarh IED Blast | छत्तीसगडमध्ये 'आयईडी' स्फोटात ३ जवान शहीद

राज्‍य ३१ मार्च रोजी नक्षलवादमुक्त घोषित, आयईडी निष्क्रिय करताना स्‍फोट
Chhattisgarh IED Blast
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Chhattisgarh IED Blast

रायपूर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य समोर आले आहे. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या एका सुरुंग स्फोटात ३ जवान शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीआरजीचे (DRG) जवान एक आयईडी निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा स्फोट झाला. या घटनेत एका निरीक्षकासह डीआरजीचे ३ जवान शहीद झाले आहेत.

'नक्षलवादमुक्त' घोषित केल्यानंतर राज्‍यात पहिलाच स्फोट

विशेष बाब म्हणजे, ३१ मार्च रोजी नक्षलवादमुक्त घोषित केल्यानंतर राज्यातील नक्षलवादी कारवायांशी संबंधित हा पहिलाच स्फोट आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात झाला. हा परिसर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहे.

Chhattisgarh IED Blast
custodial death case | सत्यमेव जयते! महिला कॉन्‍स्‍टेबलचे धाडस...कोठडीतील हत्या प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा कशी झाली?

तीन जवाह शहीद

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डीआरजीचे पथक नक्षलवाद्यांनी पेरलेले आयईडी शोधून ते निष्क्रिय करण्याची मोहीम राबवत असताना हा स्फोट झाला. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना एक आयईडी सापडला होता. तो निष्क्रिय करत असताना अचानक स्फोट झाला, ज्यामुळे ४ जवान गंभीर जखमी झाले. त्यापैकी ३ जवानांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेत निरीक्षक सुखराम वट्टी, कॉन्स्टेबल कृष्णा कोमरा आणि कॉन्स्टेबल संजय गढपाले यांनी घटनास्थळीच प्राण गमावले. तर कॉन्स्टेबल परमानंद कोमरा हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Chhattisgarh IED Blast
Cricket Selection Tragedy |वेदनादायी! टीममध्ये निवड न झाल्याने १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचलले टोकाचे पाऊल

आयईडी निष्क्रिय करताना झाला स्फोट

बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक (IG) पी. सुंदरराज यांनी सांगितले की, "कांकेर जिल्हा पोलिसांचे पथक आयईडी निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अचानक झालेल्या स्फोटामुळे ३ जवान शहीद झाले असून १ जवान गंभीर जखमी आहे."

Chhattisgarh IED Blast
Sacrificial Ritual: आई की चेटकीण! मुलाचा आजार बरा करण्यासाठी मुलीचा दिला बळी... आईसह तांत्रिकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Chhattisgarh IED Blast
Daughter Killed Mother: धक्कादायक! बॉयफ्रेंडवर उडवायला पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईलाच अल्पवयीन मुलीनं संपवलं

शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळाली मोठी मदत

आयजी पी. सुंदरराज यांनी पुढे नमूद केले की, अलीकडेच शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळालेली माहिती आणि गुप्तचर यंत्रणांच्या इनपुट्समुळे मोठी यश संपादन करता आली आहेत. कांकेरसह बस्तर रेंजमधील ७ जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी आधीच पेरलेले शेकडो आयईडी बॉम्ब शोधून काढण्यात आले आहेत. इतकेच नाही तर हे आयईडी वेळेत आणि सुरक्षितपणे निष्क्रियही करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news