पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप वाहन उलटून सोमवारी (दि.२०) भीषण अपघात झाला. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत व्यक्तींच्या मृतदेहावर आज (दि.२१) कावर्धा जिल्ह्यातील सेमरा गावात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी १९ चिता पेटल्याचा (Chhattisgarh accident) प्रसंग पाहताच संपूर्ण गाव हळहळले, या संदर्भातील वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप वाहन उलटून १९ जण ठार झाले, तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहे. बैगा आदिवासी समाजातील 25-30 लोकांचा एक गट तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून परतत होता. दरम्यान बहपनी परिसरात त्यांचे वाहन 20 फूट खोल खड्ड्यात पडून हा अपघात झाला. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संपूर्ण गावात शोककळा (Chhattisgarh accident) पसरली होती.
या भीषण अपघातातील मृत व्यक्तींची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. या प्रसंगाने गावातील लोक देखील भावूक झाले. एकाच वेळी १९ जणांची चिता जळताना पाहून संपूर्ण गावकऱ्यांचे हृदय हेलावले. १९ मृततदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा देखील (Chhattisgarh accident) सहभागी होते.
छत्तीसगडमधील या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर ट्विट केले की, 'छत्तीसगडमधील कवर्धा येथे झालेला रस्ता अपघात अतिशय वेदनादायक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. ते पुढे म्हणाले की, यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे, असेही पीएम मोदींनी स्पष्ट केले आहे.
छत्तीसगडमधील या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासोबतच सर्व जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी ही घोषणा केली आहे.
हेही वाचा: